Loksabha Election Result : प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी उडवली भाजपची झोप

Mahavikas Aghadi : अनुसूचित जातीच्या राखीव पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
Loksabha Election
Loksabha Electionsarkarnama

Mahavikas Aghadi News : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या वाशीम,दर्यापूर,उमरेड, नागपूर उत्तर,चंद्रपूर,देगलूर या सारख्या 19 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे. लोकसभेच्या अनुसूचित जातीच्या पाचही राखीव जागा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. बळवंत वानखेडे, प्रणिती शिंदे, श्याम बर्वे या विजयी उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

महाविकास आघाडीने महायुतीला अवघ्या 17 जागांवर रोखले. विशेषत: अनुसूचित जातीच्या राखीव पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भात भाजपला BJP मोठा फटका बसला आहे. विदर्भातील रामटेक, अमरावती या दोन्ही राखीव जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. 29 अनुसूचित विधानसभा मतदारसंघातील 19 मतदारसंघात महाविकासस आघाडीला लीड आहे.

दलित मुस्लिम मतदारांचा मोठा पाठींबा महाविकास आघाडीला मिळाला आहे. राखीव मतदारसंघातून बळवंत वानखेडे, प्रणिती शिंदे, श्याम बर्वे, डाॅ.शिवाजी काळगे, भाऊसाहेब वाघचौरे हे उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता आली नाही.

राखीव मतदरासंघातील विजयी उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत राखीव मतदारसंघात हे उमेदवार जोरदार प्रचार करतील त्यामुळे भाजपला राखीव मतदारसंघात निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

Loksabha Election
Manoj jarange News : 'मराठ्यांच्या मतावर निवडून येता, मग तुम्हाला मस्ती येते'; जरांगे पाटील खासदार काळेंवर भडकले...

'महाविकास'ला लीड

वाशीम,दर्यापूर,उमरेड, नागपूर उत्तर,चंद्रपूर,देगलूर, बदनापूर, देवळाली , कुर्ला, धारावी, पुणे कॅन्टॉन्मेंट,केज,उमरगा, मोहोळ, माळशिरस, मिरज,भंडारा,अर्जुनी मोरगाव, उमरखेड

'महायुती'ला लीड

मूर्तिजापूर, भुसावळ, मेहेकर, उदगीर, फलटण, हातकणंगले, श्रीरामपूर, अंबरनाथ, संभाजीनगर (पश्चिम), पिंपरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com