Yasin Malik wife letter to Rahul Gandhi Sarkarnama
देश

Yasin Malik wife letter to Rahul Gandhi : काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना पाठवले पत्र!

Yasin Malik wife Mushaal Hussein allegations on BJP : जाणून घ्या, पत्रात नेमकी काय मागणी केली आहे? ; भाजपवरही केला आहे मोठा आरोप!

Mayur Ratnaparkhe

Yasin Malik News : जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रिंट(जेकेएलएफ)चा प्रमुख यासीन मालिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवून, तुरुंगात बंद असलेल्या आपल्या पतीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा आग्रह केला आहे. मुशाल यांनी दावा केला आहे की, त्यांचा पती जम्मू-काश्मीरमध्ये शांतता कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

मानवधिकार आणि महिला सशक्तिकरणाच्या मुद्य्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या माजी सहायक मुशाल यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात तीन दशक जुन्या राजद्रोहाच्या प्रकरणात मलिकच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. ज्यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA)ने त्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

काश्मिरी फुटरतावादी नेता मलिक टेरर फंडिगशी निगडीत याप्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने एनआयएच्या वतीने त्याच्याविरोधात दाखल याचिकेवर स्वत:च युक्तिवाद करत आहे. एनआयएने याप्रकरणातील एक अपील दाखल करत मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयास केली आहे. एनआयएने 2017च्या या प्रकरणात मलिकसह अनेक जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तर 2022मध्ये कनिष्ठ न्यायालयाने मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एनआयएने 2017च्या या प्रकरणात मलिकसह अनेक जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

पत्रात काय म्हटले आहे? -

मुशाल यांनी राहुल गांधींना(Rahul gandhi) पत्रात म्हटले आहे की, 'मलिक तुरुंगातील अमानुष वागणुकीच्या निषधार्थ 2 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करत आहे. हे उपोषण त्याच्या प्रकृतीवर आणख विपरीत परिणाम करेल. यामुळे ज्या व्यक्तीने शस्त्र सोडून अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचा जीवा धोक्यात येईल.'

भाजपवर केले आहेत आरोप -

मुशाल यांनी आरोप केला आहे की, भाजप(BJP) सरकार 2019 पासून मलिकला सर्व अकल्पनीय पद्धतीने त्रास देत आहे. मलिकवर 35 वर्षे जुन्या प्रकरणात भारताविरोधात युद्ध छेडण्याचा खटला चालवला जात आहे आणि आता एनआयए त्याच्याविरोधता दाखल बनावट प्रकरणात त्याच्यासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहे.

बुशरा यांनी असेही म्हटले की, मी तुम्हाला(राहुल गांधी) आग्रह करते की तुम्ही संसदेत तुमच्या उच्च नैतिक आणि राजकीय प्रभावाचा वापर करून यासीन मलिकच्या प्रकरणावर चर्चा सुरू करावी, जो जम्मू-काश्मीरमध्ये दिखाव्यापुरती नाही तर खरोखर शांतता कायम राखण्याचा मार्ग बनू शकतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT