Mani Shankar Aiyar on US Election : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. जगभरातून ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष अभिनंदन केले आहे. असे असताना आता आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि भूमिकांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एवढंच नाहीतर अय्यर(Mani Shankar Aiyar) यांनी ट्रम्प यांचे वर्णन एक संशयित चारित्र्याचा व्यक्ती असंही केलं आहे. अमेरिकेतील नागरिकांनी चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच अय्यर यांनी म्हटले की, मला अतिशय दु:ख होत आहे की, ट्रम्प की ट्रम्प सारख्या संशयित चारित्र्याचा व्यक्ती जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा राष्ट्रध्यक्ष निवडला गेला आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष नव्हतं करायला पाहीजे.
तसेच अय्यर यांनी पुढे सांगितले की, हे अतिशय वेदनादायी आहे की एका शक्तिशाली देशाचे नेतृत्व अशा एका व्यक्तिद्वारे केले जाईल, ज्यास विविध 34 विविध प्रकरणांमध्ये अपराधी म्हणून दोषी ठरवलं गेलेलं आहे. अमेरिकेने अशा व्यक्तीची निवड केली आहे, ज्याने अनेक महिलांसोबत संबंध बनवले आहे आणि आपली पाप लपवण्यसाठी, त्यांची तोंड बंद करण्यासाठी पैसे दिले आहे. मला नाही वाटत, की अशा चारित्र्याची व्यक्ती आपल्या देशासाठी आणि जगासाठी चांगला आहे.
अय्यर यांनी ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान मोदींचे(PM Modi) असलेल्या चांगले संबंध यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की मी हे देखील मानतो की पंतप्रधा मोदी आणि ट्रम्प यांच्यात वैयक्तिक पातळीवर विशेष ताळमेळ आहे. जो मला वाटतो की पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या वैयक्तिक प्राथमिकतांवर चुकीचा परिणाम करतो.
डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा निवडणुकीत पराभव केला. आता ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. ते दुसऱ्यांदा या सर्वोच्च पदावर बसणार आहेत. याआधी ते 2016ते 2020 याकाळात राष्ट्राध्यक्ष होते. मात्र २०२०मध्ये त्यांचा जो बायडेन यांनी पराभव केला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.