Yogi Adityanath
Yogi Adityanath 
देश

योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा, १०० दिवसात दहा हजार पोलीसांची भरती

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanth) यांनी युपीच्या जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्यात त्यांनी पुढील 100 दिवसांचा अजेंडा तयार करण्याचे आदेश दिले असून राज्यातील पोलिस (Police) खात्यातील रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. येत्या शंभर दिवसांत किमान दहा हजार पोलिसांची भरती होईल, अशा पद्धतीने रोडमॅप तयार करायला हवा, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

अयोध्येला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज त्यांच्या घरी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. दरम्यान दुसऱ्यांदा युपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज युपीला आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचे गिफ्ट दिले असल्याची चर्चा सध्या युपीत सुरु आहे.

युपी विधानसभा निवडणूकूत योगी आदित्यनाथ यांचे निवडणूक चिन्ह बुलडोझर होते. निवडणूक काळापासून त्यांची ओळखच बुलडोझर बाबा अशी झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी पुर्वीप्रमाणेच पोलिस अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. नुकतेच त्यांनी गाझियाबादचे एस.एस.पी पवन कुमार यांना कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित केले आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी २ एप्रिलपासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिशन शक्ती अंतर्गत जनजागृती मोहीम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, लखनौ येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीत योगी यांनी प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तेच काम जिल्हास्तरावर व्हायला हवे. गुन्हेगारांवरील कारवाईत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच, प्रत्येक तहसीलमध्ये अग्निशमन दलाची स्थापना करण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT