CM Yogi Adityanath's recently inducted AgustaWestland AW139 helicopter. Sarkarnama
देश

अजितदादांच्या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात 100 कोटींचे 'सुपर' हेलिकॉप्टर : इटलीहून खास खरेदी; खराब हवामानातही ठरेल 'किंग'

Yogi Adityanath : Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यात १०० कोटींचे 'ऑगस्टा वेस्टलँड AW139' हेलिकॉप्टर सामील झाले आहे. डबल इंजिन आणि क्रॅश-सेफ्टी सिस्टममुळे हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते.

Hrishikesh Nalagune

Yogi Adityanath : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर देशभरातली नेते, व्हिआयपी हवाई प्रवासाबाबत अलर्ट झाले आहेत. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आता जगातील सर्वात सुरक्षित मानले जाणाऱ्या हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे. ऑगस्टा वेस्टलँड AW139 हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर त्यांच्या ताफ्यात सामील झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर एखाद्या 'उडाण करणाऱ्या किल्ल्या'सारखे मानले जाते.

उत्तर प्रदेश सरकारने हवाई प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी काही उपाय सुचविले होते. त्यानंतर इटलीच्या लिओनार्डो कंपनीकडून हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आले आहे. ऑगस्टा वेस्टलँड AW139 चा वापर जगभरात केवळ व्हीआयपी प्रवासासाठीच नाही, तर पोलीस कारवाई आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठीही केला जातो. हे हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारचे 3 वैमानिक इटलीला गेले होते. इथे त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत लँडिंग करण्याचे कसब आत्मसात केले.

खराब हवामानातही ठरेल 'किंग'

बऱ्याचदा दाट धुके किंवा पावसामुळे हेलिकॉप्टरच्या प्रवासात अडथळे येतात. मात्र, AW139 मध्ये बसवण्यात आलेल्या हाय-टेक नेविगेशन सिस्टिममुळे हे हेलिकॉप्टर भर अंधारातही सहज उडू शकते. दाट धुके असेल आणि कमी दृश्यमानता असतानाही हे विमान सुरक्षित मार्ग शोधण्यास सक्षम आहे. यात प्रगत एव्हीओनिक्स आणि 'क्रॅश सेफ्टी सिस्टिम' आहे, जी व्हीआयपी प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

ऑगस्टा वेस्टलँड AW139: वैशिष्ट्ये काय आहेत?

  • वेग आणि पल्ला: हे हेलिकॉप्टर ताशी ३१० किमी वेगाने उडू शकते आणि एकावेळी १ हजार किमीपर्यंतचा प्रवास करू शकते.

  • बैठक व्यवस्था: यामध्ये १५ प्रवासी बसू शकतात, परंतु व्हीआयपी प्रवासासाठी यात केवळ ६ ते ८ सीट्स ठेवून सोय अधिक आरामदायी केली आहे.

  • किंमत: या आलिशान आणि सुरक्षित हेलिकॉप्टरची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे.

  • जगभर आहे मागणी : आजच्या काळात नेत्यांच्या दौऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे जगभरात या हेलिकॉप्टरला मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT