

Rajya sabha seats 2026 : देशभरातील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक घोषित झाल्यानंतर काल कोण बिनविरोध आणि कुणाला निवडणुकीला सामोरे जावे लागणार, हे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. देशभरातील २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचाही समावेश आहे. मात्र, ११ जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपसह काँग्रेसचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत कुणाला धक्का बसणार, हे १६ मार्चला स्पष्ट होणार आहे. बिहार, हरियाणा आणि ओडिशा या तीन राज्यांमध्ये ११ जागांवर एकमेकांसमोर आव्हान उभे करण्यात आले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
कोण-कोण बिनविरोध?
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शरद पवार यांच्यासह रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते, रामदास वडकुते, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवार बिनविरोधत निवडून आले आहेत. तर तेलंगणातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी पुन्हा राज्यसभेत दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे बंगालमधून पाच, तमिळनाडूमधील सहा, छत्तीसगडमधील दोन, आसाममधील तीन, हिमाचल प्रदेशतील एक आणि तेलंगणातील दोन राज्यसभा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
कुठे होणार निवडणूक?
हरियाणातील दोन जागा, ओडिशातील चार आणि बिहारमधील पाच जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. ओडिशामध्ये चार जागांसाठी मैदानात पाच उमेदवार आहेत. भाजपने दोन उमेदवार रिंगणात उतरविले असून एका उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय बीजेडीने एक आणि काँगेसने एका उमेदवाराला समर्थन दिले आहे. भाजप आणि बीजेडीच्या अनुक्रमे दोन व एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. मात्र चौथ्या जागेसाठी भाजप समर्थित दिलीप रे आणि काँग्रेस समर्थित दत्तेश्वर मिक्ष यांच्या लढत होणार आहे.
बिहारमध्ये पाच जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे राष्ट्राध्यक्षांसह नितीन नबीन यांचाही समावेश आहे. एनडीएकडून पाच उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. तर आरजेडीकडून पाचव्या जागेसाठी अमरेंद्र धारी सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडून येण्यासाठी ४१ मतांची गरज एनडीएकडे एकूण एकूण २०२ आमदार आहेत. कुशवाह यांना तीन अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. तर आरजेडीलाही सहा मते कमी पडत आहेत. दोन्ही उमेदवारांना असदुद्दीन ओवेसी यांच्या सहा आमदारांची गरज आहे. त्यामुळे ही मते कुणाला मिळणार यावर राजकारण फिरणार आहे.
हरियाणात काँग्रेसवर टांगती तलवार
हरियाणामध्ये दोन जागा असून तीन उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपचे संजय भाटिया तर काँग्रेसचे कर्मवीर बौध्द यांच्या प्रमुख लढत आहे. सतीश नांदल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तिहेरी तिरंगी लढत होईल. त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. भाटिया यांचा विजय निश्चित असून कर्मवीर बौध्द यांना नांदल यांच्याशी भिडावे लागणार आहे. काँग्रेसकडे ३७ आमदार असून विजय निश्चित मानला जात असला तरी पक्षासमोर फुटीची भीती आहे. मागील एका निवडणुकीत पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असूनही फुटीमुळे अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.