Abhijeet Dipke_ man who threatened to kill him 
देश

Abhijeet Dipke: “माझा चेहराही दाखवतो आता”; अभिजीत दिपकेला धमकी देणारा तरुण आला समोर, २३ तास झाले पण पोलिसांना सापडेना

'कोकरोच जनता पार्टी' नावाची चळवळ सुरु करुन भारतातील तरुणांच्या असंतोषाला वाट मोकळी करुन देणाऱ्या अभिजीत दिपके याला आणि त्याच्या कुटुंबियांना आता उघडपणे आणि उद्दामपणे जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या आहेत.

Amit Ujagare

Abhijeet Dipke: 'कोकरोच जनता पार्टी' नावाची चळवळ सुरु करुन भारतातील तरुणांच्या असंतोषाला वाट मोकळी करुन देणारा अभिजीत दिपके याला एका अज्ञात तरुणाननं मेसेजद्वारे भाजपत प्रवेश कर नाहीतर जीवे मारु अशी धमकी दिली होती. या धमकीच्या मेसेजचे स्क्रीनशॉट स्वतः अभिजीतनं शेअर केले होते. पण आता हा धमकी देणारा तरुण समोर आला आहे. त्यानं व्हिडिओ संदेशातून पुन्ह एकदा अभिजीत दिपकेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळं आता या तरुणावर महाराष्ट्राचं गृहखातं काय कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे.

आधी मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी

अभिजीत दिपकेनं काल ट्विट करुन आपल्याला आणि कुटुंबाला जीवेमारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मेसेजद्वारे एका अज्ञातव्यक्तीनं मेसेजद्वारे त्याला धमकी दिली होती. यात धमकी देणाऱ्यानं म्हटलं होतं की, सुन पैसा मिलेगा तुझे ये अकाऊंट बंद करदे वरना बीजेपी मे आ आजा, वरना अमेरिका मे ही मरवा देंगे तुझे! (ऐक तुला पैसे मिळतील हे अकाऊंट बंद कर, किंवा भाजपत ये. नाहीतर तुला अमेरिकेतच मारुन टाकू!)

व्हिडिओद्वारे दिली धमकी

त्यानंतर आणखी एका फोन क्रमांकावरुन तरुणानं व्हिडिओद्वारे अभिजीत दिपकेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यात तो म्हणतो की, ते बाप का घर मिलग गया है, आज शाम को देख क्या होता है! तसंच पुढे एका मिनिटाच्या व्हिडिओत हा तरुण सुरुवातीला अभिजीत दिपकेला आईवरुन शिवीगाळ करतो. त्यानंतर उद्दामपणे म्हणतो की "तू माझा फोन नंबर व्हायरल करतोयस, आता तर मी माझा चेहरा पण दाखवला आहे. तू काय करु शकतोस? मी तुला पुन्हा एकदा सांगतो की, तुझ्याजवळ टाईम आहे भाजपत ये तुझी गरज आहे.

या सीजेपीनं काहीही होणारं नाही. जसे आपल्या पायाखाली झुरळं मरतात ना त्याप्रकारे तुझी झुरळं (कोकरोच जनता पार्टीचे सदस्य) देखील अशीच दाबली जातील. यापेक्षा तू या मुलांकडून दुसरं काही चांगलं काम करुन घे, तुझ्यासाठी हे चांगलं नाही. बाकी तू कुठे राहतोस, तुझे आई-वडील कुठे राहतात? हे आम्हाला सगळं माहिती आहे. तसंच तुझी भावंड कुठे आहेत? तू कधी अमेरिकेला गेला होतास? तुझं घर कुठे आहे? तुझा नवा फोन नंबर काय आहे? हे आम्हाला सगळं माहिती आहे"

व्हिडिओ येऊन २३ तास झाले तरीही पोलिसांना धमकी देणार सापडेना

अभिजीत दिपकेला व्हिडिओद्वारे धमकी देणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ समोर येऊन आता २३ तास उलटले आहेत. या व्हिडिओ त्याचा चेहराही दिसतो आहे, उलट "मी आता चेहराही दाखवतो तु माझं काय वाकडं करणार आहेत" अशा शब्दांत त्यानं पुन्हा अभिजीत दिपकेला धमकी दिली आहे. पण अद्याप पोलिसांना हा तरुण सापडलेला नाही. केवळ संभाजीनगरच्या पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पण या धमकी देणाऱ्या तरुणाला कधी अटक होणार अशी विचारणा आता सोशल मीडियातून होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT