Abhijeet Dipke: 'कोकरोच जनता पार्टी'च्या नावानं फेक अकाऊंट! 'आप' अन् 'काँग्रेस'विरोधात सुरु आहे प्रचार; अभिजीत दिपकेचा भाजपवर गंभीर आरोप

Abhijeet Dipke: भारतातील तरुणांमधील असंतोषाला वाट मोकळी करुन देण्यासाठी कोकरोच जनता पार्टी ही चळवळ उभी करणारा आणि केवळ चारच दिवसात या चळवळीला तब्बल २ कोटी भारतीयांना दिलेला पाठींबा म्हणजे अभूतपूर्व घडमोड मानली जात आहे.
CJP Abhijeet Dipke news
CJP Abhijeet Dipke newsSarkarnama
Published on
Updated on

Abhijeet Dipke: भारतातील तरुणांमधील असंतोषाला वाट मोकळी करुन देण्यासाठी कोकरोच जनता पार्टी ही चळवळ उभी करणारा आणि केवळ चारच दिवसात या चळवळीला तब्बल २ कोटी भारतीयांना दिलेला पाठींबा म्हणजे अभूतपूर्व घडमोड मानली जात आहे. पण या कृतीमुळं हादरलेल्या सत्ताधाऱ्यांना याची काळजी वाटू लागल्याची स्थिती आहे. त्यामुळं या चळवळीसाठी तयार करण्यात आलेलं इन्स्टाग्रामचं अकाऊंट, अभिजीत दिपकेचं पर्सनल इन्टा अकाऊंट हॅक करण्यात आली आहेत. त्याचबरोबर दीपकेचं ट्विटर अकाऊंट आणि बॅकअप अकाऊंट देखील डाऊन करण्यात आल्याचां गंभीर आरोप अभिजीत दिपकेनं सकाळीच केला होता. त्यानंतर आता त्यानं आणखी एक महत्वाची माहिती दिली आहे.

CJP Abhijeet Dipke news
IB report Modi government : IBच्या अहवालामुळे खळबळ? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अकाऊंट हॅकप्रकरणी नाना पटोलेंचा गंभीर आरोप

फेक अकाऊंटवरुन खोटा प्रचार

अभिजीत दिपके यानं दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यानं कोकरोच जनता पार्टी फॉर इंडिया नावाच्या एका इन्स्टापेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या दोन स्क्रीनशॉट्सपैकी एक आम आदमी पार्टीच्या विरोधातलं तर दुसरा स्क्रीनशॉट हा काँग्रेसच्या विरोधातला आहे. पण आपल्या नव्या पक्षाच्या अर्थात कोकरोच जनता पार्टी नावाच्या अकाऊंटवरुन हे करण्यात आलेलं नाही. ज्या अकाऊंटवरुन या गोष्टी पसरवण्यात येत आहेत. ते अकाऊंट @Cockcoach4India नावाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. हे अकाऊंट फेक अकाऊंट असून भाजपच्या आयटी सेलनं तयार केलं आहे, असा गंभीर आरोप स्वतः अभिजीत दिपके यानं केला आहे.

CJP Abhijeet Dipke news
Kerala Ministry : केरळमध्ये देशातील पहिले ‘AI मंत्रालय’, करणार 'हे' काम!

भाजपच्या आयटीसेलवर गंभीर आरोप

कारण आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे भाजपचा कट्टर विरोध असलेले पक्ष आहेत आणि या दोन्ही पक्षांबाबत कोकरोच पार्टीच्या नावाचा वापर करुन ज्या पद्धतीनं टीका करण्यात आली आहे. त्यावरुन हा प्रकार भाजपच्या आयटीसेलकडून करण्यात आल्याचं अभिजीत दिपके यानं म्हटलं आहे. त्याचबरोबर या अकाऊंटविरोधात तक्रार करण्यासाठी त्याला रिपोर्ट करा असं आवाहनही त्यानं केलं आहे.

CJP Abhijeet Dipke news
Cockroach Janta Party: देशभरात चर्चा झालेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजीत दिपकेला धमकी; संभाजीनगर पोलिसांचा संरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय

ओरिजिनल अकाऊंट काय?

दरम्यान, कोकरोच जनता पार्टीचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट कोणती आहेत? हे देखील अभिजीत दिपके यानं आपल्या या ताज्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यानुसार, @CJP_2029, @Cockroachisback ही दोन अकाऊंट अधिकृत अकाऊंट असल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.

स्क्रीनशॉटमध्ये नेमंक काय?

अभिजीत दिपके यानं फेक अकाऊंटवर ज्या पद्धतीचा खोटा प्रचार सुरु करण्यात आला आहे. त्यातील एका स्क्रीनशॉटमध्ये एका न्यूज चॅनेलला शिवीगाळ करण्यात आली आहे. कारण हा मुद्दा आम्ही उपस्थित केला असून आम आदमी पार्टीचा सदस्य असलेल्या अभिजीत दिपके यानं नाही. त्याला नागरिकांच्या समस्यांमध्ये रस नाही तर तो केवळ केजरीवाल यांचा अजेंडा राबवत आहे, असं त्यात म्हटलं आहे.

तर दुसऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये काँग्रेसविरोधात पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींचा फोटो वापरुन राहुल गांधी हे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत असं म्हटलं आहे. त्याचबरोबर एकामागून एका निवडणुकीत त्यांचा पराभव होत असून त्यांचं वय सध्या ५५ वर्षे असून ते केवळ कुटुंबाच्या पुण्याईवर त्यांचं काम सुरु आहे. देशावर गांधी घराणं लादण्यात आलं आहे, अर्धाकाळ तर ते काडीचाही अर्थ नसलेल्या गोष्टी बोलत असतात. ते कायम तरुणांच्या उत्कर्षाच्या गोष्टी करत असतात पण कधीच तरुणांना संधी देत नाहीत. अशा प्रकारचा मजकूर या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं हे मजकूर कोकरोच पार्टीनं पोस्ट केलेला नाहीतर भाजपच्या आयटीसेलनं फेक अकाऊंट बनवून व्हायरल केला असल्याचा आरोप अभिजीत दिपकेनं केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com