Russia Ukraine War Latest News Sarkarnama
देश

रशियाला शांत करण्यासाठी झेलेन्स्कींचा मोठा निर्णय

Russia Ukraine war news|रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीच युक्रेनचे दोन प्रांत डोनेट्स्क आणि लुहान्स्क ताब्यात घेतली होती.

सरकारनामा ब्युरो

कीव : रशियाकडून होणारे हल्ले थांबवण्याच्या उद्देशाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. युक्रेन नाटोचे सदस्यत्व घेणार नाही. तसेच रशियन समर्थक डोनेस्तक आणि लुहान्स्क या दोन प्रांताच्या स्थितीवर तडजोड करण्यासही तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Russia Ukraine war latest news in marathi)

रशियन सैनिकांनी हल्ला करत या दोन प्रांतावर ताबा मिळवला आणि या दोन प्रांतांना स्वतंत्र्य देशाची मान्यता दिली. हे दोन प्रांतही रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या कारणांपैकी एक असल्याचे मानले जाते. एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी या घोषणा केल्या केल्या आहे. नाटो युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही. नाटो विवादास्पद गोष्टी आणि रशियाशी संघर्षाला घाबरत आहे आणि मला गुडघ्यावर बसून काहीतरी मागणाऱ्या अशा देशाचे अध्यक्ष व्हायचे नाही.

विशेष म्हणजे युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये, अशी रशियाची इच्छा आहे. नाटोचा होणारा विस्तार हा एक धोका असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. कारण रशियाला आपल्या समोर नवीन पाश्चात्य मित्र राष्ट्रांचे सैन्य नको आहे.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी, रशियाने युक्रेनची दोन राज्ये डोनेट्स्क आणि लुहान्स्क ताब्यात घेतली. तसेच या दोन राज्यांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. आता युक्रेननेही या दोन प्रांतांना सार्वभौम आणि स्वतंत्र म्हणून मान्यता द्यावी, अशी पुतीन यांची इच्छा आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील वाढलेल्या तणावामागे नाटो हे देखील एक कारण आहे. युक्रेनला नाटोचे सदस्य बनण्याची इच्छा आहे. याचा अर्थ रशियाच्या सीमेपर्यंत नाटो सैन्याची कायमस्वरूपी उपस्थिती असू शकते. NATO ने 2008 च्या बुखारेस्ट शिखर परिषदेत युक्रेन आणि जॉर्जियाच्या नाटो सदस्य होण्याच्या इच्छेचे स्वागत केले. मात्र काही कारणास्तव सभासदत्व देण्यात आले नाही. एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेले युक्रेन नाटोचे सदस्य बनणे रशियन राजवटीला शोभणारे नाही. नाटो कराराच्या कलम 10 मध्ये सदस्य होण्याचे खुले आमंत्रण दिले आहे. यानुसार, उत्तर अटलांटिक प्रदेशाच्या सुरक्षिततेचा प्रचार आणि देखभाल करू इच्छिणारा कोणताही युरोपीय देश सदस्य होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT