Shankar Mandekar fitness Sarkarnama
फिटनेस

Shankar Mandekar: 'शोले'मुळे जिद्दीने संघर्ष करण्याची उर्मी; जनसेवेत गुंतल्याने आजाराला संधीच नाही

Shankar Mandekar fitness Politician Fitness Secrets:नेत्यांचा फिटनेस: रोज अठरा ते वीस तास लोकहिताच्या कामात गुंतल्याने झोपही गाढ व आरोग्यदायी लागते. हेच खरे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसचे रहस्य आहे.

सरकारनामा ब्यूरो

निर्व्यसनी राहणे, सकारात्मक विचार, लोकसहवास, आहारपथ्य आणि शांत संयमीपणा या तत्त्वांची आचार विचारात अंमलबजावणी केल्याने सार्वजनिक जीवनात वावरताना थकवा, कंटाळा आणि मरगळ येण्याची सूतराम शक्यता राहत नाही. साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा आणि सतत कामात झोकून दिल्यामुळे थकवा तर नाहीच शिवाय आजाराला संधीच मिळत नाही. त्यामुळे रोज अठरा ते वीस तास लोकहिताच्या कामात गुंतल्याने झोपही गाढ व आरोग्यदायी लागते. हेच खरे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसचे रहस्य आहे, भोर-वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर आपल्या निरोगी आरोग्याचे रहस्य उलगडले.

निर्व्यसनी राहणे, सकारात्मक विचार, लोकसहवास, आहारपथ्य आणि शांत संयमीपणा या तत्त्वांची आचार विचारात अंमलबजावणी केल्याने सार्वजनिक जीवनात वावरताना थकवा, कंटाळा आणि मरगळ येण्याची सूतराम शक्यता राहत नाही. साधी राहणी, स्पष्टवक्तेपण आणि सतत कामात झोकून दिल्यामुळे थकवा तर नाहीच शिवाय आजाराला संधीच मिळत नाही. त्यामुळे रोज अठरा ते वीस तास लोकहिताच्या कामात गुंतल्याने झोपही सुदृढ लागते. हेच खरे शारीरिक आणि मानसिक फिटनेसचे रहस्य आहे. मी वयाचे एकावन्नावे वर्ष पूर्ण केले असून रात्री दोन दोन वाजेपर्यंत पायाला भिंगरी बांधून कामे उरकत असतो.

माझे शिक्षण इयत्ता बारावी पर्यंत झाले असून कॅाम्प्यूटर प्रोग्राम या विषयात आयटीआयमध्ये शिक्षण घेतले आहे. या संगणक शिक्षणाचा फायदा माझ्या कामात होत असतो. दांभिकपणा न ठेवता प्रत्येक विषयावर सडेतोड आणि स्पष्ट बोलण्यामुळे नंतर चिंता करण्याची वेळ येत नाही. असत्याशी वाकडे असल्याने सारवासारवीचा कधी प्रश्नच येत नसल्याने झोपही शांत लागते. त्यामुळे फिटनेस टिकून असतो.

मला कुस्ती, क्रिकेट, बैलगाडा आदी खेळांची जास्त आवड असून अन्य खेळांबद्दलही आवड आहे. कारले वगळून सगळेच पदार्थ आहारात असतात. शाकाहारात कडधान्ये जास्त आवडतात. याशिवाय काळा घेवडा आणि वाटाणा भाजी आवडीची आहे. मांसाहारामध्ये मटण आवडते. खाण्याचे पथ्य मात्र ते आवर्जून पाळतात. चमचमीत, तिखट, तेलकट असे पदार्थ पूर्ण टाळतो. जेवण दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी एकदाच असते. तेही मर्यादित. बाहेरचे जेवण शक्यतो टाळतो. हॅाटेलच्या जेवणाचा त्रास होतो. गोड पदार्थ, चहा, चपाती आदी पदार्थ कमीत कमी खाण्यात येतात.

गड, किल्ले चढण्याने व्यायाम

दिवसभर वेगाने चालणे ही रोजची सवय झाली आहे. त्यामुळे सकाळी वेगळा व्यायाम करायची गरज राहत नाही. गड, किल्ल्यांवर पायी चालत जाण्याचा वारंवार योग येत असल्याने बऱ्याचदा तोच मोठा व्यायाम होतो. रायगड किल्ल्यावर अनेकदा जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी रायगड किल्ल्याची वारी बऱ्याचदा होत असल्याने व्यायामाचा आपोआप सराव होतो. पाच वर्षांपूर्वी आरोग्य तपासणी केली होती. त्यानंतर आज अखेर आजार न आल्याने अद्याप तपासणीसाठी जाता आलेले नाही. लोकांच्या गराड्यात सतत असल्याने त्यांच्या प्रेम आणि आपुलकीमुळे शारीरिक मानसिक ऊर्जा मिळते. त्यामुळे आजारी पडायची वेळच येत नाही.

इतिहासाची पुस्तके वाचणे, इतिहास समजून घेणे, गड-किल्ले, संप्रदाय, संस्कारक्षम पुस्तके, संस्कृती जोपासणारी पुस्तके आदी वाचनाची त्यांना जास्त आवड आहे. संत संगती, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, भजनकरी, प्रवचनकार तसेच धार्मिक वृत्तीच्या लोकांशी संवाद व सहवास हा रोजचाच आणि सतत होत असतो. त्यामुळे सकारात्मक विचार मनात बिंबत असल्याने मानसिक सुदृढ होण्यात मदत होते. त्यांना चित्रपट पाहायला तसेच विविध गाणी ऐकायला आवडतात. अमिताभ बच्चन यांचे सर्वच चित्रपट आवडतात. शोले हा सर्वांत आवडता चित्रपट. त्यामुळे जीवनाशी जिद्दीने संघर्ष करण्याची उर्मी तयार होते. कुटुंबाला मात्र वेळ देता येत नाही. तरीही सकाळी आईचे दर्शन घेऊन बाहेर पडलो की दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

(शब्दांकनः धोंडिबा कुंभार, पिरंगुट)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT