Shivajirao Adhalrao Patil Fitness Funda: Sarkarnama
फिटनेस

Shivajirao Adhalrao Patil: नेत्यांचा फिटनेस: वयाच्या ६८व्या वर्षीही तिशीतली ऊर्जा!

Shivajirao Adhalrao Patil Fitness Funda: शिरूर लोकसभा मतदारसंघातील सुमारे साडेचार हजार गावे-वाड्या-वस्त्या-उपनगरे येथील कार्यकर्ते, नागरिक, मतदार आजही तितकेच त्यांच्याशी संपर्कात आहेत. ते आलेला एकही मोबाइल कॉल टाळत नाहीत.

भरत पचंगे

Shivajirao Adhalrao Patil fitness secret: आदल्या दिवशीची दैनंदिनी कितीही व्यस्त असली तरी दुसऱ्या दिवशी दररोज पहाटे पावणेसहा वाजता उठून शाळेच्या ग्राऊंडवर सव्वातास चालणे, पुढील २० मिनिटे सूर्यनमस्कार व पुशअप व्यायाम. ही दिनचर्या गेल्या नऊ वर्षांपासून अथक सुरू आहे.

तारुण्याच्या जोशात आणि प्रचंड व्यावसायिक कष्टाच्या काळात चुकून लागलेली सिगारेटची सवय. २०१६ मध्ये ती एकाच क्षणात बंद करुन वरील दिनचर्येमुळे आजही दिवसभर १० तास काम करण्याची क्षमता केवळ टिकून नाही तर गेली ३५ वर्षे सोबत असलेला मधुमेह त्यांनी जवळपास ‘रिव्हर्स’ केला आहे. खासदारकीची हॅट्ट्रिक केलेले माजी खासदार, ज्येष्ठ उद्योगपती, पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे हे ऊर्जागुपित.

लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथून लहानपणीच मुंबईत जाऊन सुरुवातीला मिळेल ते काम आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करीत यशस्वी उद्योगपती म्हणून नावलौकीक मिळविलेले ज्येष्ठ उद्योगपती, लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करणारे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव यांच्या वयाच्या ६८ व्या वर्षात असलेला फिटनेस तरुणांनाही लाजवेल असाच आहे.

मुंबई व लांडेवाडी अशा दोन्ही ठिकाणी निवासस्थाने असली तरी ‘शिवसंकुल’ नावाने उभ्या असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालय, एमबीए कॉलेज, भीमाशंकर बीएड कॉलेज, डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज, ब्ल्यूबेल प्रेफ स्कूल अशा तीन हजार विद्यार्थी संख्येच्या २५ एकर विद्या प्रांगणाच्या परिसरात सव्वा तासांचे चालणे आणि त्यानंतर २० मिनिटांचे सूर्यनमस्कार व पुशअप व्यायाम यांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात होतो. पुढे बरोबर नऊ वाजता डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराप्रमाणे नाष्टा करून ते तयार होतात आणि कार्यालयात बरोबर १० वाजता सर्वांसाठी उपस्थित होतात.

दहाला कामाला सुरवात

सन २००४मध्ये सर्वप्रथम लोकसभेत गेल्यापासून त्यांनी सुरू केलेला आजही सुरू असलेला आणि सुमारे ८५०पेक्षा जास्त संख्येने यशस्वी झालेला जनता दरबार दर रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतो. मात्र हीच दहाची वेळ आठवड्याच्या इतर दिवशीही कुणी आले तरी ते उपलब्ध होतात. कार्यालयीन कामे उरकून ते थेट शिवसंकुलात जाऊन तेथील आढावा घेणे, तीन हजार विद्यार्थी, २५० कर्मचारी वृंद यांच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेऊन दुपारी दोन वाजता निवासस्थानी परततात.

दुपारनंतर मतदारसंघ व इतर कामे

दररोजचे मतदारसंघातील दौऱ्यांचे, भेटीगाठीचे आणि सुमारे ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या कामकाजाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून असलेले नियोजन ते सकाळीच करतात आणि दिवसभर त्याची अंमलबजावणी करतात. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सुमारे साडेचार हजार गावे-वाड्या-वस्त्या-उपनगरे येथील कार्यकर्ते, नागरिक, मतदार आजही तितकेच त्यांच्याशी संपर्कात आहेत. ते आलेला एकही मोबाइल कॉल टाळत नाहीत. पर्यायाने त्या प्रत्येकाच्या सुख-दु:खात सोबत राहण्याची त्यांची सवयही त्यांच्या तंदुरूस्तीचे खरे गुपित असल्याचे ते आवर्जून सांगतात.

आणि सिगार-लायटर एक महिना खिशात...!

तारुण्यात सतत कार्यमग्न असताना चुकून लागलेले सिगारेटचे व्यसन सन २०१६मध्ये वयाच्या ६०व्या वर्षी अचानक सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय शेवटाला नेण्यासाठी एक सिगार आणि लायटर तब्बल महिनाभर खिशात हात न लावता ठेवून स्वत:च्याच निग्रहाची लढाई जिंकण्याची त्यांची ही अनोखी क्लृप्ती अनेक सिगार सोडू इच्छिणारांसाठी प्रेरणा म्हणावी लागेल. कोरोना काळात याचा फायदा झाल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

आणि मधुमेह मुक्तीकडे प्रवास...!

गहू-तांदूळ पूर्ण वर्ज्य करुन आहारात मोजकेपणा आणल्याने गेली ३० वर्षे मधुमेहामुळे ७८ युनिट्स इन्शुलिन घेत असलेले आढळराव पाटील वयाच्या ६८ व्या वर्षी जेमतेम ८ युनिटपर्यंत आलेले असून मधुमेहमुक्तीच्या दिशेने त्यांचे यशस्वी पाऊल पडल्याचे ते आवर्जून सांगतात. आढळराव पाटलांची दिनचर्या आणि त्यांचा मनोनिग्रह त्यांना तब्बल ३५ वर्षांच्या सोबतीच्या मधुमेहालाही संपूर्ण संपविण्याच्या दिशेने ते घेऊन चाललेत हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT