Rutuja Latke sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur : अंधेरी पोटनिवडणूक कोल्हापूर कनेक्शन; ऋतुजा लटके शाहूवाडीच्या स्नुषा...

श्रीमती लटके Rutuja Latke यांचे सासरे व कै. रमेश यांचे वडील कोंडिराम लटके हे मूळचे शाहूवाडीचे Shahuwadi असले तरी गेल्या ४० वर्षांपासून मुंबईत Mumbai फुले विक्रीचा व्यवसाय करत होते. अंधेरी Andheri परिसरातच त्यांचे वास्तव्य होते.

सरकारनामा ब्युुरो

कोल्हापूर : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा यांची निवड निश्चित समजली जाते. श्रीमती लटके या कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्याच्या सूनबाई असल्याने त्यांच्या विजयाने अंधेरी व कोल्हापूरचे कनेक्शन पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू असून श्रीमती लटके यांच्या विजयाची प्रतीक्षा कोल्हापूरकरांना निकालापर्यंत राहणार आहे.

कै. रमेश लटके यांनी २०१९ ची निवडणूक जरी अंधेरीतून लढवली असली तरी तीन ऑक्टोबर २००० मध्ये झालेल्या त्यावेळच्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत शाहूवाडीचे दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती संजीवनी गायकवाड विजयी झाल्या होत्या. तर कै. लटके यांना ११ हजार ७४६ मते पडली होती.

राज्यात अलीकडेच घडलेल्या सत्तांतरानंतरची अंधेरीची निवडणूक ही पहिलीच होती. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून मुरजी पटेल यांची भाजपकडून उमेदवारीही निश्‍चित झाली होती. पण नाट्यपूर्ण घडामोडीनंतर पटेल यांचा अर्ज भाजपने मागे घेतला.

त्यामुळे श्रीमती लटके यांची निवड निश्‍चित असली तरी त्यासाठी निकालापर्यंत वाट पहावी लागणार आहे. श्रीमती लटके यांचे सासरे व कै. रमेश यांचे वडील कोंडिराम लटके हे मूळचे शाहूवाडीचे असले तरी गेल्या ४० वर्षांपासून मुंबईत फुले विक्रीचा व्यवसाय करत होते. अंधेरी परिसरातच त्यांचे वास्तव्य होते.

श्रीमती ऋतुजा यांचे माहेर चिपळूण आहे. वडिलांबरोबरच कै. रमेश हेही मुंबईतच वास्तव्याला होते. पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक असलेल्या रमेश यांची २०१९ मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाली होती. मे महिन्यात दुबईच्या दौऱ्यावर असताना रमेश यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे.

कोल्हापुरात संस्कृतीचा विसर....

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पंढरपूर, देगलूरसह कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीविरोधात भाजपने उमेदवार उभा करून तो निवडून आणला. कोल्हापूर उत्तरमध्येही भाजपने उमेदवार दिला. पण अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ‘संस्कृती ’म्हणत भाजपने उमेदवार मागे घेतल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपला या संस्कृतीची विसर कसा झाला? असा सवालही उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT