निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार मशाल की ढाल-तलवार ? काय म्हणाल्या, ऋतुजा लटके

Andheri by poll अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच चढाओढ सुरु झाली आहे.
Andheri by poll
Andheri by poll
Published on
Updated on

Andheri by poll मुंबई : आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशींच, मी लढणार आणि जिंकणारच, असा विश्वास स्वत: ऋतुजा लटके यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यालयात आज माध्यमांनी ऋतुजा लटके यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

अंधेरीच्या जागेसाठी ऋतुजा लटकेंवर राजकीय दबाव असल्याची चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात सुरु आहे. याबाबच ऋतुजा लटके यांच्याशी संवाद साधला असता या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहे. आपण कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, मी मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आणि जिंकणारसुद्धा. आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशी आहे आणि कायम त्यांच्याशीच एकनिष्ठ राहणार. रमेश लटके एकनिष्ठ शिवसैनिक होते. आम्हीही ठाकरेंशीच एकनिष्ठ राहणार. असे उत्तर लटके यांनी दिले.

Andheri by poll
Andheri By Poll| मोठी बातमी : अंधेरी पोटनिवडणूक भाजप नाही तर शिवसेना शिंदे गटच लढवणार

तुमच्यावर शिंदे गटाचा दबाव आहे का, असा सवाल पत्रकारांनी विचारणला. यावर बोलताना लटके म्हणाल्या की, माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला कोणतीही ऑफर नाही. पण आज तिसरा दिवस आहे. मी कार्यालयात येऊन बसते आहे. पण काही तांत्रिक अडचणी असल्याचे मला सांगण्यात आले आहे. मी काय अडचण आहे विचारलं तर माझ्या एका सहीसाठी राजीनामा देण्यात अडचणी येत असल्याचं मला सांगण्यात आलं. राजीनाम्याची सर्व प्रोसेस झाली आहे. पण गेल्या तीन दिवसांपासून राजीनामा देण्यासाठी चालढकल करण्यात येत आहे. तरीही मी महापालिका आयुक्तांना आजच्या आज राजीनामा स्वीकारा, अशी मागणी केली आहे.

या सर्व प्रकरणावर आज शिवसेना नेते अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत, शिंदे गटावर आरोप केले आहे. लटके या मुंबई महापालिकेत नोकरी करतात. त्यांनी निवडणुकीला उभे राहण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा ३ ऑक्टोबर महापालिका आयुक्तांना दिला होता. मात्र, अजूनही त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. शिंदे गटाकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. आमच्याकडून निवडणूक लढणार असाल तरच राजीनामा मंजूर होईल, असं सांगण्यात त्यांना सांगण्यात आलं आहे. मंत्रीपदाचीही ऑफर त्यांना शिंदे गटाकडून देण्यात आली असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com