Gopichand Padalkar | Gopichand Padalkar News | Political News Updates
Gopichand Padalkar | Gopichand Padalkar News | Political News Updates Sarkarnama
कोल्हापूर

Gram panchayat Results : गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं; 'मातोश्रीं'च्या गळ्यात सरपंचपदाची माळ!

सरकारनामा ब्यूरो

Gram panchayat Results : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या आहेत, आणि पडळकरवाडी ग्रामपंचायतवर ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. 7 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर (Gopinchand Padalkar) यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत.

राज्यभरातील 7135 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले होते. या ग्रामपंचायत(Gram panchayat) निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, शिंदे गटासह महाविकास आघाडीच्याही दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारराजा नेमका कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार तर कुणाला पराभवाचा धक्का देणार हे स्पष्ट होत आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, भाजप ठाकरे गट अशा थेट लढती झाल्या असल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत आत्तापर्यंत भाजपाला सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसली आहे. प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी देखील या निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देत जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

खासगी दवाखान्यांतही मोफत उपचार आणि सगळ्याच ग्रामस्थांना रेशनही मोफत, असा आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पॅटर्नप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत जाहिरनामा व आश्वासन देणाऱ्या डॉ. अनिता दहिफळकर - गदळे सरपंपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT