Beed News : खासगी दवाखान्यांतही मोफत उपचार आणि सगळ्याच ग्रामस्थांना रेशनही मोफत, असा आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पॅटर्न प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत जाहिरनामा व आश्वासन देणाऱ्या डॉ. अनिता दहिफळकर - गदळे सरपंपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. Grampanchayat Election
त्यांच्या गटाचे सर्व दहा सदस्य देखील विजयी झाले आहेत. केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. (Beed News) डॉ. अनिता शषिकांत दहिफळकर - गदळे यांनी शितल बालासाहेब मोराळे यांचा पराभव केला. (Marathwada)
ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अनिता दहिफळकर यांच्या जाहीरानाम्यात १२ आश्वासने देण्यात आली आहेत. यामध्येही खासगी दवाखान्यांत दहिफळ ग्रामस्थांना मोफत उपचारासह अगदी रेशनही मोफत मिळेल, असे आश्वासन दिले होते.
माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, राहूल गदळे व शरद गदळे यांच्या आघाडीच्या सरपंचपदासाठी उमेदवार असलेल्या अनिता दहिफळकर डॉक्टर आहेत. त्यांचे पती डॉ. शशिकांत दहिफळकर देखील डॉक्टर आहेत.
ग्रामस्थांनी त्यांच्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पारड्यात विजय टाकला आहे. आता मोफत रेशन आणि खासगी दवाखान्यांतील मोफत उपचाराचे आश्वासन डॉ. अनिता दहिफळकर यांना पाळावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.