Kolhapur : दिवाळी पाडव्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कुटुंबातील लोक पवार यांच्या गोविंदबाग येथे एकत्र आलेत; पण उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार पहिल्यांदाच गोविंदबागेत आले नाहीत. त्यामुळे चर्चेंना उधाण आले आहे. रोहित पवार दौऱ्यावर असल्याने आले नाहीत, तर अजित पवार हे आजारी असल्याचे सांगितले जाते. त्यावर मुश्रीफ यांनी अजित पवार का आले नाहीत, याचे कारण सांगितले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबीय दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एकत्र आले आहेत; पण या वेळी मात्र पवार कुटुंबीयांच्या एकत्र येण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयांची पहिली दिवाळी होत आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष बारामतीच्या गोविंदबागेकडे लागले आहे. पवार कुटुंबीय एकत्र येत दिवाळी पाडवा साजरा करत असतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित आहेत. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.
"राजकारण वेगळे आणि नाती वेगळे असतात. त्यामुळेच पवार कुटुंबीय एक आहे. काल प्रताप पवार यांच्या घरी सर्वजण जेवायला एकत्र होते. आजारपणामुळे आज अनुपस्थित असू शकतील. त्यामुळे आज अजितदादा गोविंदबागेत उपस्थित नसल्याबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.