Somaiya vs Mushrif Sarkarnama
कोल्हापूर

Hasan Mushrif : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

Hasan Mushriff : काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुश्रीफांवर घोटाळ्याचा आरोप..

सरकारनामा ब्यूरो

Hasan Mushriff : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल, पुण्यामधील घरांवर बुधवारी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरु आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकऱणी ईडीकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ईडीची टीम मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाली होती. तव्हापासून ही कारवाई अद्यापही सुरुच आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता ईडीने ही कारवाई केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याची माहिती समोर येत आहेत. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले होते. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरु आहे.

गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ईडीची माझ्या पुणे आणि कागल येथील घरांवर छापेमारी सुरु आहे. या छापेमारीविषयी अधिकची माहिती घेऊन लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.

किरीट सोमय्या यांचा आरोप काय?

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केले होते. त्यावेळी १२७ कोटी त्यांच्या कंपनीत कसे आले याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. मुश्रीफ परिवाराच्या सदस्यांच्या नावे फक्त २ कोटी रूपये आहेत. बाकीचा पैसा घोटाळ्याचा आहे.

मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. या कारखान्याची कागदपत्रे सोमय्या यांनी ईडीकडे दिली होती. २०२० मध्ये कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट कंपनीला देण्यात आला. कोणताही दमडीचा अनुभव नसताना हा कारखाना त्यांना चालवायला देण्याचे कारण म्हणजे मुश्रीफ यांचे जावई या कंपनीत असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला होता. या आरोपाविषयीची कागदपत्रे सोमय्या यांनी ईडीला दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT