Kolhapur News: गोकुळ दूध संघाचे राजकारण अत्यंत शिगेला पोहोचले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून होणारे आरोप महाडिक गटाच्या जिव्हारी लागले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी महाडिक गटाकडून पत्रक जारी करत मुश्रीफ गटाच्या आरोपांना कडक शब्दात उत्तर दिले आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघातील सगळीच प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा महाडिक गटाकडून देत 'बात निकली है तो दूर तलक जायेगी' एवढे लक्षात ठेवा असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
दूध संघात सध्या कुणाच्या नावाने किती टँकर आहेत ? कुणाचे नातेवाईक अधिकारी आहेत? कुणाचा जावई दुसऱ्याच्या नावाने एजन्सी चालवत आहे? कुणाची नात औषध पुरवत आहे? कोण पशुखाद्य वाहतुकीचा ठेका घेत आहे? कुणाच्या नावे दूध वितरणाचे ठेके आहेत ? कुणाच्या पतसंस्थेतील मॅनेजरच्या नावाने संघात गाडी भाड्याने लावली आहे? कुणाचा ताराबाई पार्कातील अधिकारी पैसे गोळा करतो ? खरेदी विभागांमध्ये कोण एजंट म्हणून काम करतो? कुणी संघाच्या पैशाने हॉटेल बांधले? याची देखील माहिती लवकरच बाहेर येईल, असा इशारा तानाजी पाटील यांनी दिला.
गायत्री कोल्ड स्टोअरेजला दरवाढ दिली तेव्हा अध्यक्ष नविद मुश्रीफ होते. त्यांनीच ती दिली तेव्हा गैरकारभार दिसला नाही का? गोकुळमध्ये प्रशासक आल्यानंतर काही नेत्यांचे तेच तेच बगलबच्चे येऊन बालिश आरोप करत आहेत.
आपले बिंग फुटणार म्हणून प्रशासकांची बदनामी देखील सुरू आहे. गोकुळचे माजी संचालक युवराज पाटील यांचे चिरंजीव विजय पाटील यांनी आरोप करण्यापूर्वी वडिलांचा इतिहास तपासावा. शेतकरी संघाचा 'बैल बसवणारे' व भूविकास बँक भुईसपाट करणारे आज गोकुळवर प्रश्न विचारू लागेल आहेत, सहकारी संस्थेतून अपात्र झालेल्या या लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही. असा टोला तानाजी पाटील यांनी लागवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.