Kolhapur Politics Sarkarnam
कोल्हापूर

Sanjay Mandalik: मेहुण्याला साथ देणार की पाठीराख्याचं पांग फेडणार; मंडलिकांसमोर पेच

Kolhapur Politics Sanjay Mandalik support NCP MLA Rajesh Patil Shivajirao Patil: मंडलिक हे मेहुणे आमदार राजेश पाटील यांना साथ देणार की शिवाजीराव पाटील यांचे पांग फेडणार असा पेच त्यांच्यासमोर आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात चंदगड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्वच नेते सहभागी होते. सुरुवातीला काही जणांकडून माजी खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला विरोध झाला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने आणि यशस्वी शिष्टाईने नाराज महायुतीच्या नेत्यांना समजूत घालण्यात यश आले.

लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या पराभवानंतर माजी खासदार मंडलिक हे आगामी विधानसभा निवडणुकीत आपले मेव्हणे आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांना साथ देणार की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) यांचे पांग फेडणार असा पेच त्यांच्यासमोर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

कागल विधानसभा मतदारसंघ प्रमाणेच चंदगड विधानसभा मतदारसंघात लोकसभा महायुतीचे नेते संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ अग्रस्थानी होते. मंडलिक यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यां गटाचे आमदार राजेश पाटील, शिवसेनेतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले संग्रामसिंह कुपेकर, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, भाजपचे नेते शिवाजीराव पाटील असे अर्धा डझन नेते महायुतीच्या प्रचारात व्यस्त होते.

लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज यांच्यामुळे फारसे यश त्यांना मिळाले नसले तरी, महायुती म्हणून त्यांच्यासाठी चांगले प्रयत्न झाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीला मंडलिक हे कोणाच्या पारड्यात झुकतील हे सांगणे कठीण आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अशोक चराटी, शिवकडून संग्रामसिंह कुपेकर, आणि भाजपमधून बंडखोरी केलेले शिवाजीराव पाटील, आणि राष्ट्रवादीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. युतीची मते विभागल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांना झाला. राजेश पाटील हे अवघ्या साडेचार हजार मतांनी निवडून आले आहेत. मात्र यंदा राज्यातील सत्ता बदलामुळे मतदारसंघावर ही त्याचा परिणाम झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत हे सर्वच नेते एकत्र पाहायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांच्याच महत्वकांक्षा वाढल्या आहेत. उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महायुती स्वतंत्र लढल्यास भाजपमध्ये बंडखोरी अटळ दिसते. शिवाय महायुती एकत्र लढल्यास तरीही शिवाजीराव पाटलांची बंडखोरी ही निश्चित मानली जाते. त्यामुळे लोकसभेला मदत झाल्यानंतर माझी खासदार संजय मंडलिक हे आपले मेहुणे राजेश पाटील यांच्यासोबत राहणार की शिवाजीराव पाटील यांची साथ देणार हे आगामी काळातच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT