Jayant Patil On Raju Shetti: राजू शेट्टींची चूक झाली, त्यांना सन्मानाने मविआत घ्या!

Raju Shetti Should Join Maha Vikas Aghadi: शेट्टी यांच्यामुळे महायुतीला कोणता फायदा होईल? असे मी होऊ देणार नाही. मागील आठवड्यात शेट्टी यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सन्मानाने शेट्टी यांना आघाडीत घ्यावे, असेही जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil | Raju Shetti
Jayant Patil | Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News: शेकापचे माजी आमदार जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत येण्यासाठी पुन्हा एकदा साद घातली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शेट्टी यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेतली होती. भेटीनंतर कोल्हापुरात आल्यानंतर पाटील यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. आम्ही वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना सांगत होतो.

तुम्ही महाविकास आघाडीमध्ये येऊन निवडणूक लढवा.पण त्यांनी चूक केली. आम्ही त्यांना पुन्हा आव्हान करतो की त्यांनी इथून पुढे महाविकास आघाडीत यावे आणि निवडणुका लढवाव्यात, अशी साद जयंत पाटील यांनी घातली.

Jayant Patil | Raju Shetti
Jayant Patil On Union Budget : महाराष्ट्राला 60 हजार कोटी देणार होते, त्याचे काय झाले?; जयंत पाटलांकडून अर्थसंकल्पाची खिल्ली

आताही शेट्टी यांना महाविकास आघाडीत येण्यासाठी विनंती केली आहे. त्यांना आघाडीत घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. शेट्टी यांच्यामुळे महायुतीला कोणता फायदा होईल? असं मी होऊ देणार नाही. मागील आठवड्यात शेट्टी यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सन्मानाने शेट्टी यांना आघाडीत घ्यावे, असेही जयंत पाटील म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत चार चार मत देण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसकडून ती चार मते मिळाली नाहीत.जर ती मते मिळाली असती तर विजयाच्या जवळपास पोहोचलो असतो. काँग्रेस फुटलेल्या मतांवर कारवाई करेल. पण आज ना उद्या मी पुन्हा एकदा विधिमंडळात येईन अशी मला खात्री आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दर पाच वर्षांनी शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन होत असते. यंदा हे अधिवेशन 2 ऑगस्ट रोजी पंढरपुरात होत आहे. किमान सात ते आठ हजार कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल होतील. यंदा या अधिवेशनाला मित्र पक्षांना देखील आमंत्रित करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Jayant Patil | Raju Shetti
Jayant Patil On Cabinet Expansion : 'दोन महिने का होईना आम्हाला मंत्री कराच'; महायुतीच्या आमदारांच्या भूमिकेवर जयंत पाटलांचे बोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com