maharashtra Ekikaran Samiti  Sarkarnama
कोल्हापूर

कर्नाटक सरकारने मेळाव्याला परवानगी नाकारली; बेळगाव सीमेवर वातावरण पेटलं

Maharashtra - Karnataka Border Dispute : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra - Karnataka Border Dispute : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्याला महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व एकीकरण समितीचे नेते बेळगावच्या दिशेनं निघाले आहेत. मात्र, कोगनोळी टोलनाक्यावर एकीकरण समितीचे नेते दाखल झाल्यावर त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरु केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा महामेळावा आता रद्द करण्यात आला आहे.  महामेळावा रोखण्यासाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दबावतंत्र सुरू झाल्याचं दिसून येत आहे. तसेच मेळाव्यासाठी करण्यात आलेला मंडप देखील काढण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी सकाळी अचानकपणे मेळाव्याच्या ठिकाणी 144 माहिती देत या परिसरात महाराष्ट्रातील नेते मंडळींना बेळगावात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

बेळगावच्या माजी महापौरांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील पोलिसांनी सुरु केली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाविकास आघाडीसह एकीकरण समितीचे नेते सोमवारी (दि. 19) सकाळी बेळगावच्या दिशेने निघाले आहेत. या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ करत आहेत. या मोर्चात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

कोगनोळी टोल नाक्यावर पोहचल्यानंतर या मोर्चाला पोलिसांकडून अडवण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.पोलिसांकडून एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावात जाण्यापासून रोखण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरु करण्यात आली आहे. यानंतर समितीच्या नेते व कार्यकर्त्यांनी बेळगाव सीमेवर ठिय्या मांडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT