Kagal leader meets top Shinde leaders Sarkarnama
कोल्हापूर

Samarjeet Singh Ghatge: कागलमध्ये राजकीय हालचालींना वेग! समरजीत घाटगेंनी घेतली एकनाथ शिंदे, बावनकुळेंची भेट

Samarjit Ghatge meets Eknath Shinde and Chandrashekhar Bawankule : पंधरा दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीतसिंह घाटगे पवारांच्या चांगलेच जवळ दिसले होते.

Rahul Gadkar

Maharashtra Political News: पंधरा दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीतसिंह घाटगे पवारांच्या चांगलेच जवळ दिसले होते. इतकेच नव्हे तर मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी थेट घाटगे यांच्या हातात माइक सोपवला होता. मात्र, त्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या आणखी एका कृत्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी पवार यांची साथ सोडणार नाही असेही जाहीर केले होते.

त्यानंतर देखील समरजीत घाटगे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत भेटीचा सिलसिला सुरू ठेवला आहे. या भेटीनंतर कागल विधानसभा मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून समरजीत घाटगे हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादीच्या आणि शरद पवार यांच्या दौऱ्यात हजेरी लावून या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

मात्र, आता पुन्हा एकदा आज त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या भेटीचा तपशील विचारण्यासाठी घाटगे यांना संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. मात्र घाटगे यांची भेट औपचारिक असल्याचे सांगितले जाते. या भेटीमागे कोणतेही राजकारण अथवा पक्षप्रवेश नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीय सुत्रांकडून कळते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT