Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
कोल्हापूर

SambhajiRaje: ''ऐतिहासिक चित्रपट पहिल्यांदा महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांना दाखवा,नंतर दिल्लीत...''

सरकारनामा ब्यूरो

https://www.youtube.com/watch?v=75gYoPg2Ft8संभाजी थोरात

Sambhajiraje Chhatrapti News : हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक चित्रपटांत इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडसह अनेक शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. या चित्रपटांवरुन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chhatrapti) यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी हर हर महादेव या चित्रपटात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आहेत. अशा चित्रपटामुळे चुकीचा इतिहास लोकांसमोर जातो. यापुढे ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करताना पहिल्यांदा राज्यातील इतिहास संशोधकाना दाखवावा अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी केली आहे. (Sambhajiraje Chhatrapti Latest News)

संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, हर हर महादेव चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाची आम्हांला परवानगी असल्याचं सांगितलं. पण सेन्सॉर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. त्यांच्याकडे कोणते इतिहासकार आहेत हे माहीत नाही. राज्याच्या इतिहासकारांची समिती नेमणं गरजेचं आहे. पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात व्हावं. नंतर पुढच्या स्क्रिनिंगसाठी दिल्लीत सिनेमा पाठवण्यात यावं. ही माझी विनंती आहे, 

हर हर महादेव चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला. या चित्रपटात स्त्रियांचा बाजार भरवला जात असल्याचे दाखवले आहे. शिवाजी महाराज नृसिंहाचा अवतार असल्याचे दाखवले आहे, हे झालं आहे का? कोणता इतिहासकार हे खरं आहे असं म्हणतो. बाजीप्रभू देशपांडे बिना पगडीचे दाखवले आहेत, बोडक्या डोक्याने मावळे कधी महाराजांच्या समोर जात नसत, लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवाल का असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. मी जे मुद्दे मांडले आहेत ते चुकीचे आहेत हे अभिनेते सुबोध भावे यांनी सांगावे, मी विरोध मागे घेतो असेही संभाजीराजे म्हणाले.

...म्हणून इतिकारांची समिती नेमावी

हर हर महादेव चित्रपट आज टीव्ही चॅनेलवर दाखविला जाणार आहे. यावर भाष्य करताना संभाजीराजे म्हणाले, सेंन्साॅर बोर्डाची परवानगी मिळाली आहे. मात्र, सेन्साॅर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. या बोर्डात नेमके कोण इतिहासकार आहेत, माहिती नाही. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्य पातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी. चित्रपटांची पहिली स्क्रिनिंग महाराष्ट्रात करून पुढे ते सेन्साॅर बोर्डाच्या परवानगीसाठी दिल्लीला पाठवावे अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT