आघाडीच्या मोर्चात पैसे देऊन माणसं जमविल्याचा भाजपचा आरोप; अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Pawar On Bjp'S Alligation : आमच्या मोर्चाला नॅनो म्हणावं की स्कूटर हा त्यांचा विषय आहे...
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama

Ajit Pawar on Bjp'S Alligation : महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी( दि.17) महाविराट मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चावरुन आता राजकीय भाजप आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपकडून या मोर्चामध्ये पैसे देऊन माणसं जमविल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. तर हा आरोप फेटाळून लावत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला फटकारलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, प्रवक्ते केशव उपाध्ये भाजपच्या अनेक नेतेमंडळींकडून महाविराट मोर्चावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. याचदरम्यान भाजपकडून या मोर्चात पैसे देऊन माणसं जमविल्याचा खळबळजनक आरोप देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपचे प्रवक्ते उपाध्ये यांनी हा व्हिडीओ टि्वट केला आहे. उपाध्ये यांनी मुंबईतील पत्रकार संघाच्याजवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा सुरू असतानाचे दृश्य आहे. मविआ (MVA) मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने असं टि्वट केलं आहे.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
कर्नाटककडून कुरापती काढण्याचं काम सुरुच; सीमावादानंतर आता अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट!

आघाडीचा मोर्चा म्हणजे नॅनो मोर्चा...

आघाडीच्या मोर्चाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चातील पैसे वाटपाचे जे व्हिडिओ समोर येत आहेत ते लाजिरवाणं आहेत. मोर्चातील सहभागी लोकांना आपण येथे का आलो? कोणत्या पक्षाचा मोर्चा आहे हे माहीत नाही. फक्त पैसे वाटले जात आहेत ते लोकं सहभागी झाले. पण एवढं सगळं करूनही ते मोर्चासाठी संख्या जमवू शकले नाही. त्यामुळे जनतेला काय हवं आहे हे आज दिसून आले आहे. महापुरुषांच्या नावाने राजकारण करत असल्याचं जनतेला माहीत आहे. मुंबईत आघाडीचा नॅनो मोर्चा निघाला, त्यामुळे मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आले आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आघाडीला लगावला.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Mahavikas aghadi : नवनीत राणांचा जावईशोध; महामोर्चाला तीन हजारच लोकं, राणांनी महाविकास आघाडीला डिवचलं

फडणवीसांकडून नॅनो मोर्चा म्हणून खिल्ली, अजित पवार म्हणाले...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप फेटाळत म्हटलं आहे की, महापुरुषांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा विरोधात महाविकास आघाडीच्या मोर्चात जनतेनं सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्याच आवाहनानुसार लोक सहभागी झाले. नेहमी आम्ही महाविकास आघाडीसाठी आम्ही एकत्र येत असतो, पण मोर्चासाठी एकत्र आलो याचं समाधान आहे. पण भाजपकडून करण्यात माझ्या माहितीप्रमाणे पैसे वाटप झालेले नाही, मी शेवटपर्यंत मोर्चात होतो, कारण नसताना बदनामी होत आहे. उपमुख्यमंत्री यांनी मोर्चाला नॅनो म्हणावं की स्कूटर म्हणावं हा त्याचा विषय आहे, आम्ही त्याला महत्व देत नाही अशा शब्दांत पवारांनी फडणवीसांना फटकारलं आहे.

आघाडीसाठी पैसा गेल्याचं दु:खं नाहीतर...

शिंदे-फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावरची ताकद दाखवून लोकांच्या गर्दीची बेरीज केलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या तिजोरीतून मात्र तब्बल तीन कोटी रुपयांची वजाबाकी झाल्याचा प्राथमिक 'हिशेब' आहे. मोर्चा मुंबईत असल्याने एकूण खर्चापैकी बहुतांशी रक्कम शिवसेनेच्या नेतृत्वाने मोजल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापाठोपाठ ठाकरे सरकारमध्ये 'अर्थ' खाते सांभाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोटी रुपयांच्या खर्चाचा भार उचलल्याचे आकडे पुढे येत आहेत; तर काँग्रेसनेही आपल्या राजकीय 'वजन' सारखेच जमेल तसा हातभार लावला. पैसा गेल्याचे दुःख नाही पण लोक जमल्याचा आनंद आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर लपून राहिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com