Satej Patil, Dhananjay Mahadik Sarkarnama
कोल्हापूर

Satej Patil : धनंजय महाडिक टोलच्या बाजुने, सतेज पाटलांनी 'त्या' वक्तव्याचा वचपा काढला!

Rahul Gadkar

Satej Patil News : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्यामुळे टोल वसुली बंद करावी, अशी मागणी करत आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील टोल माफिया असल्याचा आरोप केला होता.

महाडिक यांच्या त्या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी वचपा काढत टोल नाका चालवण्याची थर्ड पार्टी कोणाची हे लवकरच कळेल, असा इशारा दिला आहे.

टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या प्रश्नांच्या बाजुने नाहीत. ते टोल वसूल करणाऱ्यांच्या बाजुने आहेत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. आम्ही टोल नाक्याची कागदपत्राची मागणी केली आहे. यावरून टोल नाका चालवणारी थर्ड पार्टी कोणाकडे आहे, हे लवकरच सिद्ध होईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.

महामार्गावर खड्डे आहेत. महामार्गवरील सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी टोल देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मासिक पासमध्ये देखील सवलत मिळावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत तर ते टोलच्याच बाजुने बोलत आहेत. झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता. पण त्यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, असे सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटील टोल माफिया

सतेज पाटील यांनी केलेल्या आंदोलनावरून धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील टोल माफिया आहेत. अशी जहरी टीका केली होती. सतेज पाटील यांनी टोल आंदोलन केले. हे आंदोलन म्हणजे सतेज पाटील यांचा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न आहे. स्वतः सतेज पाटील हेच टोल माफिया आहेत. कोल्हापुरात टोल आंदोलन झाले होते. अनेकजन अजुनही त्रास भोगत आहेत. त्यावेळी हे मंत्री असताना त्यांना टोल माफी होती. मात्र त्यांनी स्वतः टोल पावती फाडली. त्यांनी टोलमध्ये गफला केल्यानेच त्यांनी पावती फाडली होती.,असा आरोप खासदार महाडिक यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT