Pune News: उड्डाणपूल उद्घाटनावरून भाजप, ठाकरे गट, शरद पवार गट आमने-सामने

Pune Sinhagad Road Flyover Inauguration: भाजपाला या उड्डाणपुलाचे उद्घाटन हे बड्या नेत्याच्या हस्ते करायचे आहे. आणि त्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उड्डाणपूल खुला करण्यास विलंब करण्यात येत आहे.
Sinhagad Road Flyover Inauguration
Sinhagad Road Flyover InaugurationSarkarnama
Published on
Updated on

Pune News: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिंहगड रस्त्यावर दोन उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यातील एका उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याच उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून सध्या भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसत आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करून त्वरित तो नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून या उड्डाणपुलाचे काम अद्याप बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र भाजपाला या उड्डाणपुलाचे उद्घाटन हे बड्या नेत्याच्या हस्ते करायचे आहे. आणि त्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उड्डाणपूल खुला करण्यास विलंब करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.नागरिकांना हा उड्डाणपूल तातडीने खुला करून द्यावा अशी मागणी या ठिय्या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

Sinhagad Road Flyover Inauguration
Dharmarao Baba Atram: शरद पवार यांना वाटलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते...

सिंहगड रोड व परिसरातील नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातूनच उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, सामान्य नागरिकांचा हा उड्डाणपूल केवळ काही विशिष्ट नेत्यांच्या हातून उद्घाटन होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

सामान्य नागरिकांच्या यातनांकडे दुर्लक्ष करून केवळ काही नेत्यांची मर्जी सांभाळण्यात व्यस्त असणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली

नुकतेच शिवसेनेमध्ये दाखल झालेले आणि आपल्या लाईव्हच्या माध्यमातून नागरी प्रश्न जनतेसमोर मांडणारे वसंत मोरे यांनी काल या उड्डाण पुलावर लाईव्ह करून प्रशासनाला हा उड्डाणपूल तातडीने सुरू करण्याचा इशारा दिला. अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com