ajit pawar uddhav thackeray sunil tatkare sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare : "2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं, तर...", तटकरेंचं मोठं विधान

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार ( Sharad Pawar ) आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. "2019 मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती," अशी टीका काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. या विधानाचा खासदार सुनील तटकरे यांनी समाचार घेतला आहे. "अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं, तर महाविकास आघाडीचं सरकार टिकलं नसतं," असं मोठं विधान तटकरेंनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

"2019 मध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती. कारण, एकदा माणूस गद्दार असेल, तर त्याच्या मनात कायम असतं. जिथे जिथे संधी मिळाली तिथे अजित पवारांनी शरद पवारांच्या सहकाऱ्यांचा अपमान केला," असा आरोप आव्हाडांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देऊन उपकार केले नाहीत

सुनील तटकरे म्हणाले, "महाराष्ट्रातील सगळी कार्यालयं अजित पवार नसते, तर उभी राहिली नसती. जागा घेण्यापासून बांधण्यापर्यंत सगळं काम अजित पवारांनी पाहिलं. हे काय सांगतात अजित पवारांना उपमुख्यमंत्री दिलं म्हणून चूक झाली... 2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देऊन उपकार केले नाहीत. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदी दिलं नसतं, तर आठ दिवससुद्धा महाविकास आघाडीचं सरकार टिकलं नसतं."
भाजपत गेलेल्या अशोक चव्हाण यांना '50 कोटींचे' रिटर्न गिफ्ट...

"अजितदादांचा दिल्लीत संपर्क कमी पडतोय"

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना जागावाटपावरून लक्ष्य केलं आहे. "अजितदादांचा भाजपमध्ये वट आहे, असे वाटत होते; पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांचा वट राहिला नाही. त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत असून, विधानसभेला २० जागा मिळतील किंवा तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढा, असे सांगितले जाईल," अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT