Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election 2024 : महायुती की महाविकास आघाडी, विधानसभेला जनतेचा कौल कुणाला? मोठा सर्व्हे समोर

Sakal Survey 2024 : 'सकाळ माध्यम समूहा'नं 288 विधानसभा मतदारसंघातून 84,529 मतदारांशी संवाद साधला. त्यात विधानसभा निवडणुकीबद्दल जनतेची मते जाणून घेण्यात आली.

Akshay Sabale

लोकसभेला महाविकास आघाडीनं महायुतीला पराभवाची धूळ चारली. लोकसभेचा गुलाल उतरतोय तोच विधानसभेचं पडघम वाजू लागले आहेत. '45 पार'ची वल्गना करणाऱ्या महायुतीला '17' जागा पारही करता आले नाही.

हा पराभव महायुतीच्या ( Mahayuti ) जिव्हारी लागला आहे. तर महाविकास आघाडीला 'कॉन्फिड'न्स आल्यानं 'सरकार' आणणार म्हणत विधानसभेच्या तयारीला सुरूवात केली आहे. यातच 'सकाळ माध्यम समूहा'नं महाराष्ट्राचा राजकीय कानोसा राज्यव्यापी सर्वेक्षणातून घेतला आहे.

लोकसभेत महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) बाजूनं झुकलेला महाराष्ट्र जुलैल्या पहिल्या आठवड्यातही आघाडीच्याच बाजला असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. त्याचवेळी भाजपला राज्यातील जनतेनं पसंती दिली आहे.

सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील मतदारांचा कल 48.7 टक्क्यांसह महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. तर, पक्ष म्हणून 28.5 टक्क्यांसह प्रथम क्रमांकाची पसंती मतदारांनी भाजपला ( bjp ) दिली आहे. तर, 42 टक्के मतदारांनी विद्यमान आमदारांबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं आहे.

विधानसभेला मतदारांची पसंती कुणाला?

सर्वेक्षणात 48.9 टक्के मतदारांचा कल विधानसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. तर, 33.1 टक्के मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पसंती देणार असल्याचं म्हटलं आहे. तर, 4.9 टक्के जनतेची महायुती आणि महाविकास आघाडीलाही नाकारलं आहे. 13.3 टक्के मतदारांनी कुणाला मतं द्यायचं, हे अजून ठरलं नसल्याचं सांगितलं आहे.

कुठल्या पक्षाला जनतेची पसंती?

पक्षांमध्ये भाजपला 28.5 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. त्याखालोखाल काँग्रेस 24 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) 14 टक्के, शिवसेना ( ठाकरे गट ) 11.7 टक्के, शिवसेना ( शिंदे गट ) 6 टक्के, राष्ट्रवादी ( अजित पवार ) 4.2 टक्के, असा पाठिंबा मतदारांनी सर्वेक्षणातून नोंदवलं आहे.

आमदारांवर जनतेची नाराजी

सर्वेक्षणाचे कल विद्यमान आमदारांची चिंता वाढवणारे आहेत. 42.4 टक्के मतदारांनी विद्यमान आमदारांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर, 41.1 टक्के लोकांनी आमदारांना पुन्हा निवडून देणार नाही, असं मत नोंदवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT