Maharashtra local body elections Sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी : धाराशिव, माजलगाव, मालवणसह 67 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी राखीव; 34 मध्ये महिलाराज

Political News : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी सकाळी जाहीर केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी सकाळी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील 33 नगरपरिषद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले तर 67 नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव आहेत तर 34 नगरपालिका ओबीसी महिलासाठी आरक्षित आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. 6 ऑक्टोबर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येणार आहे.त्या पुढीलप्रमाणे

भगूर - ओबीसी महिला

इगतपुरी - ओबीसी महिला

विटा - ओबीसी महिला

बल्हारपूर - ओबीसी महिला

धाराशिव - ओबीसी महिला

भोकरदन - ओबीसी महिला

जुन्नर - ओबीसी महिला

उमरेड - ओबीसी महिला

दौडं - ओबीसी महिला

कुळगाव बदलापूर - ओबीसी महिला

हिंगोली - ओबीसी महिला

फुलगाव - ओबीसी महिला

मुरुड जंजीरा - ओबीसी महिला

शिरूर - ओबीसी महिला

काटोल - ओबीसी महिला

माजलगाव - ओबीसी महिला

मूल - ओबीसी महिला

मालवण - ओबीसी महिला

देसाईगंज - ओबीसी महिला

हिवरखेड - ओबीसी महिला

अकोट - ओबीसी महिला

मोर्शी - ओबीसी महिला

नेर- नवाबपूर - ओबीसी महिला

औसा - ओबीसी महिला

कर्जत - ओबीसी महिला

देगलूर - ओबीसी महिला

चोपडा - ओबीसी महिला

सटाणा- ओबीसी महिला

दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिला

बाळापूर - ओबीसी महिला

रोहा - ओबीसी महिला

कुर्डूवाडी - ओबीसी महिला

धामणगावरेल्वे - ओबीसी महिला

वरोरा - ओबीसी महिला

SCROLL FOR NEXT