सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची उत्सुकता लागून आहे. केंद्र सरकारने या आयोगासाठी समिती स्थापन केली असून, ही समिती वेतनवाढीबाबत शिफारसी तयार करणार आहे. त्या शिफारसींना केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला किमान एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण कालावधी लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त करण्याक येत आहे.
त्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जरी प्रत्यक्ष अंबलबजावणी उशिरा झाली तरी जानेवारी 2026 पासूनची थखबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. साधारण 18 ते 24 महिन्याचा एरिअर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे साधारण 9 लाखांपर्यंत एरिअर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो.
एरियरची रक्कम फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. सध्या2.0,2.25, 2.18 आणि 2.57 असे विविध फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगारावर ठराविक गुणक लावून नवीन बेसिक वेतन निश्चित केले जाते. सातव्या वेतन आयोगातही हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता.
सातव्या वेतन आयोगानुसार लेवल 1 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे, तर लेवल 5 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 29,200 रुपये आहे. जर 20 महिन्यांचा एरियर गृहित धरला, तर लेवल 1 ते लेवल 5 मधील कर्मचाऱ्यांना सुमारे 3.60 लाख रुपयांपासून ते 9.17 लाख रुपयांपर्यंत एरियर मिळू शकतो. ही रक्कम फिटमेंट फॅक्टर 2.0,2.15,2.28 किंवा 2.27 अशा दरांवर आधारित अंदाजानुसार मोजली जात आहे.
एरियरची गणना करताना जुन्या आणि नव्या बेसिक पगारातील फरक काढला जातो. त्यानंतर हा फरक लागू असलेल्या महिन्यांच्या संख्येने गुणला जातो. उदाहरणार्थ, जर वेतनवाढ जानेवारी 2026 पासून लागू मानली आणि अंमलबजावणी 20 महिन्यांनी झाली, तर त्या 20 महिन्यांचा फरक एकरकमी स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिला जाईल.
यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपयांची भर पडण्याची शक्यता असून, आठव्या वेतन आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीची तारीख निश्चित झाल्यानंतरच नेमकी रक्कम स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.