Dhananjay Chandrachud, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Chandrachud : आमदार अपात्रता सुनावणीच्या एक दिवस आधी सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर

Eknath Shinde Supreme Court MLA Disqualification Case : मागील काही दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात आहे.

Rajanand More

Mumbai : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात 24 सप्टेंबरला होणार आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने सुनावणी पुढे ढकलली जात असल्याने मंगळवारी होणाऱ्या सुनावणीबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, या सुनावणीच्या एक दिवस आधी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येत आहेत.

मुंबई हायकोर्टाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन 23 सप्टेंबरला होणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हायकोर्टाची नवी इमारती उभारली जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून हायकोर्टासाठी नवीन इमारतीची मागणी होत होती. त्यासाठी मुंबईतील विविध जागांच्या पर्यायांवर विचार सुरू होता. अखेर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागा अंतिम करण्यात आली आहे.

प्रस्तावित जागेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री सोमवारी एकाच व्यासपीठावर आहेत. तर मंगळवारी सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही सुटलेला नसल्याने या सुनावणीचा निकाल कधी लागणार, याबाबत प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

राज्यात पुढील काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. तसेच सरन्यायाधीश चंद्रचूड नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्याआधी या प्रकरणाचा निकाल लागणार का, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.

उध्दव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या तर शरद पवार गटाने अजित पवारांच्या गटातील आमदारांना अपात्र करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. पण काही दिवसांपासून सातत्याने तारीख पुढे ढकलली जात आहे. आता 24 तारखेला तरी सुनावणी होणार की नाही, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT