Ashish Shelar-Aditya Thackeray News Sarkarnama
महाराष्ट्र

Ashish Shelar On Aditya Thackeray : आदू बाळ, बालबुद्धीपणाचा कळस गाठू नका; शेलारांचा ठाकरेंना टोला...

BJP News : बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने टीका करतात. (BJP News( भाजपने केलेल्या अनेक दाव्यांची चिरफाड करण्याचा सपाटाच त्यांनी सध्या लावला आहे. कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमुळेच विदेश दौरा रद्द केल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP) यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी करत जपान दौरा केल्याचा आरोप करत महाराष्ट्रात किती विदेशी गुंतवणूक करण्यात आली, याचा हिशेब मागतात. ठाकरेंच्या या टीकेला भाजपकडून जशास तसे उत्तर देण्यासाठी अनेक नेते मैदानात उतरले आहेत. मुंबईतील भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यात आघाडीवर आहेत.

आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याच्या खर्चावर बोट ठेवत केलेल्या आरोपाला शेलार यांनी प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackearay) यांचा `आदू बाळ`, असा उल्लेख करत टोला लगावला आहे. या संदर्भात शेलार यांनी म्हटले आहे की, आदू बाळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते.

अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकार्‍यांचा खर्च केलेला आहे. जपान दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक करण्यात आली, याची संपूर्ण टाइमलाइन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्‍यामुळे करण्यात आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी.

बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण त्याचा कळस गाठू नका !, अशा शब्दांत शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे. वडील आजारी असताना तुम्ही लंडनमध्ये मजा मारत होतात, असा आरोपही शेलार यांनी केला आहे.

शेलार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा यात उल्लेख केला आहे. शेलार यांच्या टीकेनंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट पडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले तेव्हापासून ठाकरे गटाचे नेते भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडले आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत त्यात आघाडीवर आहेत. भाजपच्या नेत्यांनीही या दोघांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT