Mumbai News : राज्य सहकार आयुक्तांनी गुणरत्न सदावर्ते यांचे नातेवाईक असलेल्या एसटी बँकेचे व्यवस्थापक सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली. गेल्या तीन ते चार महिन्यांत एसटी बँकसंदर्भात मोठ्या घडमोडी घडल्या आहेत. एसटी बँकेतून अंदाजे 480 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढल्याचे समोर आले आहे. त्यानंतर एसटी बँकेच्या संचालक मंडळानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या काही दिवसापासून आता सहकार खाते सक्रिय झाले असून त्यांनी सौरभ पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सौरभ पाटील यांची एसटी बँकेच्या व्यवस्थापक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांच्या पॅनेलची एसटी बँकेवर सत्तेत आहे. राज्य सरकारमधील कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय सदावर्ते हा एवढी मस्ती करणार नाही, त्याला पाठिंबा देणाऱ्यांचा मी निषेध करतो, अशा कडक शब्दात शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
राज्य सरकारने हा निर्णय या आधीच व्हायला हवा होता, असे म्हणत अडसूळ यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सरकारचा मी घटक आहे. तरीही सरकारमधील त्याला पाठिंबा देणाऱ्याचा निषेध करतो. सरकार दखल घेणार नसेल तर मग आम्ही युनियन काय करतोय ते बघा, असे म्हणत त्यांनी टीका केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
Edited by: sachin Waghmare
21 वर्षाच्या मुलाला अनुभव नसताना एमडी पदावर बसवले
गेल्या तीन महिन्यात एकही मिटिंग का झाली नाही? रिझर्व्ह बँकेनेही यावर काही निर्णय घेतला नाही. एसटी बँकेत निर्णय चुकीचे घेतले गेले. बँकिंगची समज नसतानाही पत्नीच्या भावाला एमडी केले. बँकेची कणभरही माहिती नाही. कुठलेही निकष नियम न पाळता त्याची निवड केली. 21 वर्षाचा हा मुलगा, ज्याला अनुभव नसताना एमडी पदावर बसवले असल्याचा आरोप अडसूळ यांनी केला.