Abhijit Deepke sarkarnama
महाराष्ट्र

CJP Protest : मुंबईतील आंदोलनाला मोठा प्रतिसाद, 'काॅक्रोच'चे पुढचे टार्गेट दिल्ली, जंतरमंतरवरील आंदोलनाची तारीख जाहीर

Abhijit Deepke Gyanesh Kumar: अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची तारीख जाहीर केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होणार आहे.

Roshan More

Abhijit Deepke News : काॅक्रोच जनता पार्टीने अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वात मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन केले. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होते. आता दीपके यांनी थेट इशारा देत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दीपके यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाची तारीख देखील जाहीर केली आहे. जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर १० ऑक्टोबर रोजी देशभरातील 'काॅक्रोच' दिल्लीकडे कूच करतील आणि जंतर-मंतरवर आंदोलन करतील, असे ते म्हणाले.

दीपके यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'जर दिल्ली पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर ते आम्हाला जिथे अडवतील, तीच जागा आमचे 'जंतर-मंतर' बनेल.आमचे आंदोलन शांततापूर्ण असेल. आम्ही महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावरून चालू.'

लोकशाही वाचवण्याची लढाई

शांततापूर्ण आंदोलनाच्या आमच्या अधिकाराचा आदर करायचा की २० जुलै रोजी झालेली क्रूरता पुन्हा घडवून आणायची, हे सरकार आणि दिल्ली पोलिसांवर अवलंबून आहे.ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. ज्या प्रत्येक नागरिकाला मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत, त्यांनी यात सहभागी झाले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT