Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives. sarkarnama
महाराष्ट्र

CJP ON Gen Z Movement : बांग्लादेश, नेपाळ प्रमाणे भारतात जेन झी आंदोलन करणार? 'कॉकरोच' पार्टीचे संस्थापकांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले,...'

Cockroach Janta Party Abhijit Deepke : राजकारणात बसले आहेत त्यांच्यापेक्षा ही युवा पिढी जास्त शिकलेली आहे. ती अशी कोणतीही कृती करणार नाही ज्याच्यामुळे देशाचे नुकसान होईल, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

Roshan More

Abhijit Deepke News : कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर ट्रेडींगमध्ये आहे. 90 लाखांपेक्षा अधिक जणांनी या पार्टीला इन्स्टाग्रामवर फाॅलो केले आहे. जेन जीचा सर्वाधिका प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी पेज सुरु करणारे अभिजीत दिपके यांनी साम टिव्हीला सविस्त मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बांग्लादेश, नेपाळ प्रमाणे भारतात देखील जेन जीचे आंदोलन करणार का? याचे उत्तर दिले.

अभिजीत दिपके म्हणाले की, झेन जी हुशार आहे.मला खुप जणांचे मेसेज, फोन येत आहेत. ते आआयटी, डेडासाईन्स मध्ये करीअर करत आहेत. त्याची तयारी करत आहेत. ही पोरं आहेत २१ वर्षांची. यांचे शिक्षण केंद्रातील कॅबिनेटमध्ये बसलेल्यांपेक्षा जास्त आहे.

'राजकारणात बसले आहेत त्यांच्यापेक्षा ही युवा पिढी जास्त शिकलेली आहे. ती अशी कोणतीही कृती करणार नाही ज्याच्यामुळे देशाचे नुकसान होईल. ते शांतपणे आणि संविधानाच्या हद्दीत राहूनच आपले मुद्दे मांडतील. त्यांची नेपाळ, बांग्लादेशसोबत तुलना करू नका.', असे देखील दीपके यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

पुढे बोलताना ते म्हणाले, नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. यापेक्षा काय वाईट असू शकते. यानंतर काय झाले? शिक्षणमंत्र्यांवर कोणी दबाव निर्माण केला का? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांकडून राजीनामा घेतला का?

युरोपमध्ये एका देशात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला तो टुरिस्ट होता. टुरिस्टचा मृत्यू होतो म्हणून तेथील देशाचा मंत्री राजीनामा देतो. आणि आपल्या देशातील मुलं आत्महत्या करतायेत तुमच्या गैरकारभामुळे तरी येथील मंत्री राजीनामा देत नाहीत. ते त्याच जागी बसून आहेत. माणसाच्या जीवाची किंमती आहे की नाही या देशात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT