Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation Sarkarnama
महाराष्ट्र

Jantar Mantar latest updates: जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन महाराष्ट्रात झालं, पोलिस आयुक्तांनीच सांगितलं..., अभिजीत दीपकेंचा मोठा दावा

Jantar Mantar latest updates news : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

Sachin Waghmare

New dehli News : नीट पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने गेल्या २५ दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यासमोर बोलताना अभिजित दिपके यांनी मोठे विधान केले आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कात झाल्याचा मोठा दावा दिपकेंनी केला आहे. त्यासोबतच पुणे शहराच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा शुक्रवारी निघाला असल्याचा दावा पोलीस आयुक्त यांनी केला असल्याचे यावेळी त्यानी स्पष्ट करीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. राजीनामा न घेतल्यास पुन्हा २० जुलैपेक्षा मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशारा अभिजित दिपके यांनी शनिवारी जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे. मुलाना ताब्यात घेणे बंद केले नाही तर पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुलाना ताब्यात घेणे बंद केले नाही तर आंदोलन तीव्र करणार आहे. दिल्ली पोलिसांनी लाज बाळगावी. भाजपची चापलुसी करायची असेल तर वर्दी काढा. दिल्ली पोलिसांचे अधिकारी पाहिले तर राग येतोय. दिल्ली पोलिसांनी वर्दी काढून आरएसएसचा गणवेश घालावा, असे आवाहन यावेळी दिपके यांनी केले.

हे जेंनझी त्यांच्या आई-वडिलांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय ऐकणार आहेत. ते कोणत्याच व्यवस्थेला घाबरत नाहीत. मोदींनी 12 वर्ष फक्त घाबरून ठेवले आहे. पण हे जेंनझी कोणालाच घाबरत नाहीत. बिहारमध्ये आज काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले. बिहार सरकारने ही चूक करू नये, जितके विद्यार्थी तुम्ही अटक कराल, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

दिल्ली पोलिसांकडून नाहकी त्रास देणे बंद केले नाही तर आम्हाला दिल्ली पोलिस मुख्यालयापुढे आंदोलनाला बसावे लागेल. तुम्हाला माहिती आहे की, एकदा आम्ही बसलो की उठत नाहीत. अभिजीत दिपके यांनी सरकारसोबतच थेट दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दिपके ठाम आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT