RTO News Sarakarnama
महाराष्ट्र

RTO News : ...तर पोलिस अधिकारी, कर्मचारींच्या खासगी वाहनांवर कारवाई होणार!

Action on private police vehicles News सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ.गिरी यांनी पारित केला आहे आदेश ; जाणून घ्या, नेमका काय आहे आदेश?

Mayur Ratnaparkhe

Police vehicles and RTO : राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मधील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस" लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर कारवाई होणार. मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

विकी जाधव (पत्रकार) यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी खासगी वाहनांवर "पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस" लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती.

याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांमधील मधील मोटार वाहन निरीक्षक तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी, आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खासगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस तसेच वाहनांवर 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी किंवा बोध चिन्हांचा वापर वाहनमालक त्यांच्या वाहनांवर करीत असल्याचे वाहन तपासणीमध्ये निदर्शनास आल्यास दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्यात यावा. असा आदेश सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ.गिरी यांनी पारित केला आहे.

या आदेशानुसार आता राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस" लिहिलेले किंवा 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी लावण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT