Sinhagad Road Flyover Bridge : सिंहगड रोड उड्डाणपूलावरून भाजप अन् पवार गटात जुंपली; प्रशांत जगतापांच्या आरोपांना आमदार मिसाळ यांचं प्रत्युत्तर!

Madhuri Misal Vs Prashant Jagtap on Pune Sinhagad Road Flyover Bridge : 'पुढच्या चार दिवसांत देवेंद्र फडणवीस यांना घेऊन या, नरेंद्र मोदींना आणा नाहीतर जो बायडन यांना आणा मात्र हा उड्डाणपूल खुला करा, अन्यथा...' असं पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे.
Sinhagad Road Flyover Bridge : सिंहगड रोड उड्डाणपूलावरून भाजप अन् पवार गटात जुंपली; प्रशांत जगतापांच्या आरोपांना आमदार मिसाळ यांचं प्रत्युत्तर!
Sarkarnama
Published on
Updated on

Pune Sinhagad Road Flyover Bridge News : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिंहगड रस्त्यावर दोन उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यातील एका उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याच उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष होताना पाहायला मिळत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करून त्वरित तो नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून या उड्डाणपुलाचे काम अद्याप बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर भाजपाला या उड्डाणपुलाचे उद्घाटन हे बड्या नेत्याच्या हस्ते करायचे आहे आणि त्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उड्डाणपूल खुला करण्यास वेळ खाऊपणा करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात येत आहेत. यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात अली आहे.

Sinhagad Road Flyover Bridge : सिंहगड रोड उड्डाणपूलावरून भाजप अन् पवार गटात जुंपली; प्रशांत जगतापांच्या आरोपांना आमदार मिसाळ यांचं प्रत्युत्तर!
NCP Pawar Party Pune Movement : फडणवीसांना नाही, तर बायडन यांना बोलवा, पण ..; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष का झालाय आक्रमक

याबाबत स्थानिक आमदार माधुरी मिसाळ(Madhuri Misal) म्हणाल्या, 'गेल्या आठ ते दहा दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पोस्टरबाजी करून सिंहगड रस्त्यावरील पूल सुरु करावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आंदोलन देखील करण्यात आलं. मात्र यामागचे वास्ता असे आहे की, प्रशासनाकडून 08 ऑगस्टपर्यंत या उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती.

मात्र पावसामुळे काँक्रिटीकरण पूर्ण होऊ शकलं नाही आणि अशा परिस्थितीत तिसरा कोट न देता उड्डाणपूल सुरू केलास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप या पुलाचे उद्घाटन होऊ शकले नाही.'

'मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करण्यात येत आहे. आतापर्यंत सिंहगड रोड परिसरातील कोणत्याही नागरिकांनी हा उड्डाणपूल सुरू करावा अशी मागणी माझ्याकडे केलेली नाही. राष्ट्रवादी (पवार गट) फक्त नागरिकांच्या नावाखाली राजकारण करत असून आज झालेल्या आंदोलनात देखील कोणताही सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक दिसला नाही. तरी सिंहगड उड्डाणपुलाचा तिसरा कोट हा पुढील आठवड्यात पूर्ण होणारा असून पुढील आठवड्यातच हा उड्डाणपूल सुरू करण्यात येईल अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

Sinhagad Road Flyover Bridge : सिंहगड रोड उड्डाणपूलावरून भाजप अन् पवार गटात जुंपली; प्रशांत जगतापांच्या आरोपांना आमदार मिसाळ यांचं प्रत्युत्तर!
Pune News: उड्डाणपूल उद्घाटनावरून भाजप, ठाकरे गट, शरद पवार गट आमने-सामने

प्रशांत जगताप यांनी केली होती टीका -

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) म्हणाले, 'पुणेकरांच्या मतावर महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडून येण्यासाठी उड्डाणपूलाचे काम लांबवण्यात आलं आहे. राजाराम ब्रिज येथील एकेरी उड्डाणपूलाचे काम मागच्या दोन महिन्यापूर्वीच पूर्ण झाल आहे. मात्र फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं यासाठी स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांच्या हट्टापोटी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हा उड्डाणपूल खुला करण्याचं टाळत आहेत.'

तसेच, 'पुढच्या चार दिवसांत तुम्ही देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना घेऊन या, नरेंद्र मोदींना आणा नाहीतर जो बायडन यांना आणा मात्र हा उड्डाणपूल खुला करा, नाहीतर 13 तारखेला आम्ही कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी वाहतूकसाठी हा उड्डाण पूल खुला करणार आहोत.' असा इशारा जगताप यांनी दिला. तसेच आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचा दबाव झुगारून लावावा अशी विनंती आहे. असंही जगताप म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com