Milind Soman on Disha Salian Death Case sarkarnama
महाराष्ट्र

Disha Salian Death Case : मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात धक्कादायक खुलासा, ठाकरेंवर सालियानच्या वकीलाचे आरोप

Milind Soman on Disha Salian Death Case : बॉलिवूड सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहे. तर मालवणी पोलिसांनी तयार केलेल्या क्लोजर रिपोर्टमधूनही आता धक्कादायक माहिती उघड होताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने आता राज्यात खळबळ उडवून दिली असून आता यावरून वाद पेटला आहे. दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत दिशावर सामुहिक बलात्कार झाला असून तिची हत्या करण्यात आल्याची याचिका दाखल केली. यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा या प्रकरणाने उचल खाल्ली असून मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता मालवणी पोलिसांनी घेतलेल्या अभिनेता मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तर या रिपोर्टवरुन दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधत आरोप केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा यावरून वाद-विवाद रंगण्याची शक्यता आहे.

मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये मिलिंद सोमण आणि दिशा पटणीचा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. हे दोघेही दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी संबंधित होते. दरम्यान या दोघांशी संवाद साधण्याची जबाबदारी दिशावर होती. पण दिशा पटानीने करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्याने नकार दिला होता. यावरून दिशा सालियन चिंतेत होती.

तसेच याचदरम्यान मिलिंद सोमणनेही एका मोबाईल कंपनीची जाहिरातीवरून दिशाला संकंटात आणलं होते. त्याने आपल्या त्या मोबाईल कंपनीशी करार संपल्यानंतर एक ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. ज्यामुळे ती मोबाईल कंपनी अडचणीत आली होती. यावरून झालेल्या वादामुळेही दिशा तणावात होती.

दरम्यान मालवणी पोलिसानी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिच्या तणावाचे कारण तिच्या वडिलांच्या असणारे अफेअरही असल्याचे नमुदे आहे. यातच आता कंपनी, मिलिंद सोमण आणि दिशा पटणीशी तुटलेली डील यासह कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे ती त्रस्त होती हे समोर आले आहे. तर यातूनच दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.

पण आता याच क्लोजर रिपोर्टवरुन दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांनी थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप केला आहे. ओझांनी, 'ठाकरेंनी मालवणी पोलिसांना न्यायाधीशांचे अधिकार दिले होते का? कोर्टानं रिपोर्ट स्वीकारला का नाही', अशी शंका उपस्थित केली आहे.

याच मुद्द्यावरून भाजप नेते नितेश राणेंनी देखील अनेक मुद्दे उपस्थित करताना आमच्याकडेही याबाबत पुरावे आहेत. ते वेळ आल्यावर न्यायालयात दाखल करू असा इशारा दिला आहे. रामदास कदम यांनी देखील याचमुद्द्यावरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केलीय. आता या प्रकरणाची 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून न्यायालय कोणता निर्णय घेतं याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT