
Mumbai News : अर्थसंकल्पिय अधिवेशनात पुन्हा एकदा सत्ताधारी मंडळींनी दिशा सालियन प्रकरणात ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी दिशा सालियन प्रकरणात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिशा सालियन प्रकरणात मोठा दावा करीत या दाव्यातील हवाच काढली आहे.
या प्रकरणावरून प्रसार माध्यमाशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणी पोलिसांनी गुरुवारीच दिशा सालियन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे केवळ सत्ताधारी मंडळींनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र रचले आहे. मी गृहमंत्री असल्यापासून सांगत आहे, की हे एक षडयंत्र आहे, आणि हेच सत्य आहे, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
दिशा सालियन प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहेत. यावरून महायुतीच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून हे आरोप फेटाळले जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काही गौप्यस्फोट केला होता. दिशा सालियनच्या वडिलांवर त्यावेळी दबाव होता. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मला दोन फोन आले असा दावा राणे यांनी केला होता.
शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून राणे यांनी केलेला हा दावा फेटाळण्यात आला, उद्धव ठाकरे यांनी कोणताही फोन केला नव्हता, उलट राणे यांना जेव्हा अटक झाली, तेव्हा उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आला होता, असे राऊत यांनी म्हटले आहे. याच प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी देखील राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.