Nilesh Rane Vs Aaditya Thackeray over Chaddi Baniyan Gang remark sarkarnama
महाराष्ट्र

Nilesh Rane : आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर निलेश राणेंचा पारा चढला; अधिवेशनातच हिंमत दाखवण्याचे केले आव्हान

Nilesh Rane Vs Aaditya Thackeray : सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून एकनाश शिंदे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांचे मंत्रीच त्यांना अडचणीत आणणारे काम करताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

Pune News : सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार अडचणीत आले आहेत. संजय गायकवाड असो किंवा संजय शिरसाट यांच्या प्रकरणांमुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालं आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेनेला घेरलं आहे. आजही (ता. 14) विधीमंडळात आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणानंतर चड्डी बनियान गँगवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवास हतबल असल्याची टीका केली. यावरून शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आक्षेप घेतला. सध्या या हमरी-तुमरीची राज्यात चर्चा होताना दिसत आहे.

आदित्य ठाकरे यांचे आज विधानसभेत भाषण झाले. त्यात त्यांनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे नाव न घेता चड्डी बनियान गँग म्हणत टीका केली. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अशा गटाच्या बाजूला बसले आहेत, ज्यांचे लोक कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे काय करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी सहनशीलता दाखवल्याचा टोला लगावला. तसेच आदित्य ठाकरे यांनी राज्यातील या चड्डी बनियान गँगवर आता मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणावी, अशी मागणी केली.

यानंतर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आक्षेप घेत हिंमत असेल तर त्यांनी चड्डी-बनियना गँग कोण, त्यांची नावे घ्यावीत, असे चॅलेंज दिले. राणे यांनी, आदित्य ठाकरे यांनी, जे काही शब्द वापरले? ते नेमकं कोणावर कारवाई व्हावी अशी मागणी करत आहेत. चड्डी कोण त्यांची बनियान कोण? याचे उत्तर त्यांनी एकदा तरी द्यावे. थेट नावे घ्यावीत.

पण एवढीच भीती वाटत असेल तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका आणि वापरायचे असतीलच तर ते शब्द कोणासाठी वापरता ते हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावे. त्यांचे असे शब्द रोलिंगमधून काढून टाकावं, अशीही मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.

दरम्यान विधान परिषदेत देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या प्रकरणावर सरकारला घेरलं. परब यांनी चड्डी-बनियन गँग अथवा चड्डी-टॉवेल गँगचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरत आहेत. मंत्र्यांच्या बेडरूमधील व्हिडिओ बाहेर येत आहेत. सरकारतर्फे दोन दोन कपडे तरी द्या, सर्व उघडे फिरत आहेत. मंत्री उघडे नागडे फिरत आहेत, काय चाललंय महाराष्ट्रात.

बेडरूममधील व्हिडिओ बाहेर कसा आला. बेडरूममधील व्हिडिओ बाहेर येतात, म्हणजे मंत्री सुरक्षित नाहीत. बेडरुममध्ये सूट घालून झोपा, असं सांगितलेलं नाही. तुमची यंत्रणा बेडरुमपर्यंत पोखरली गेलीय. त्यामुळे आता मंत्रीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील, असा सवाल परब यांनी विधान परिषदेत विचारला होता. यावरूनही सध्या राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT