सीएसटीएमच भव्य स्टेशन तयार करण्याच काम सुरु आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल स्टेशनला द्यावं, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ अधिवेशनात म्हणाले.
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लज येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. गडहिंग्लज शहरातल्या मुख्य मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग चंदगडमार्गे जावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर 50 मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन 20 मार्क्स केलेले आहेत 11 मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांना विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
संभाजी बिग्रेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी शाईफेक करण्यात आली. दीपक काटे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला आहे. त्यानंतर गायकवाड यांना पोलिस संरक्षण द्यावे, यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण गायकवाड यांनी पोलिस संरक्षण घेण्यास नकार दिला आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला याची गरज नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी आपला अशा गोष्टीत वेळ वाया घालवू नये, असे गायकवाड यांनी सांगितले. सरकारने मला मारायचे ठरवले असेल तर कसेही मारतील तुम्ही कसे वाचवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अक्कलकोट मध्ये रचलेला कट पोलिसांना माहिती होता. तिथे संरक्षणाची गरज होती. योजना बनवताना पोलिस स्टेशन मध्ये चर्चा झाली. गुन्हेगारांना त्यांनी दूध पाजले, असा आरोप त्यांनी केला आहे.
अलिकडच्या काळात जयंत पाटलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना आवडू लागल्या आहेत, असे विधान विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे सभागृहात हशा पिकला. जयंत पाटलांनी केंद्र सरकारच्या योजनाबाबत विधान केले होते.
मारहाण करताना व्हिडिओ काढू नका, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. 'मराठीचा आवाज' या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच वरळी डोम येथे केले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावेळी 20 वर्षांनंतर प्रथम एकत्र आले . मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली होती, याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मीरा भाईंदर येथे व्यापाऱ्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी शाईफेक करण्यात आली, या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने स्टूडेंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया (सिमी) दणका दिला आहे. सिमीवर न्यायालयाने बंदी घातली आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर न्यायमूर्ती सुर्यंकांत यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येेत असल्याचे लवकर सुनावणी घ्या, अशी विनंती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली आहे. यावर आँगस्टची तारीख देऊ असे न्यायालयानं म्हटलं आहे. तर मागणीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विरोध केेला आहे. आजची सुनावली संपली आहेे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्याबाण हे चिन्ह वापरण्यापासून शिंदे गटाला रोखा, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे, याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त दोन दिवसापासून माध्यमामध्ये येत आहे. यावर पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचे सुळेंनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले.
बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्याने पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाला आहे. या घटनेचा आज विधीमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी जल्लोश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे आमदार उपस्थित होते. त्यांनी एकमेंकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.