Aditya Thackeray Meet Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना चौथ्यांदा भेटले! विरोधी पक्षनेतेपद की आणखी काय?

Aditya Thackeray Meets CM Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी विरोध करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची आणि देवेंद्र फडणीसांच्या भेटीची उस्तुकता आहे.

Roshan More

Aditya Thackeray News : विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना बुधवारी (ता.5) आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून ही आदित्य ठाकरेंची फडणवीसांसोबतची चौथी भेट आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी नेमकी भेट कशासाठी घेतली? याच्या चर्चा सुरू आहेत.

'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार आदित्य ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी मागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, या भेटीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत वरुण सरदेसाई, सचिन आहिर हे देखील होते.

विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा सांगितला आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी विरोध करण्यात येत असल्याची माहिती आहे. विधीमंडळाच्या सचिवालयाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेची असल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे-फडणवीसांची यांच्या भेटीत या विषयी चर्चा झाली का? या विषयी देखील चर्चा आहे.

मतदारसंघातील आणि राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ही भेट घेतली असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अधिकृतरित्य समजू शकले नाही.

ठाकरेंची फडणवीसांशी जवळीक?

आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली असली तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून फडणवीस-ठाकरे यांच्या भेटीबाबत ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंब हे देवेंद्र फडणवीसांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका या आधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT