Aditya Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Aditya Thackeray : धक्कादायक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना दिली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray assigns responsibility to Aditya Thackeray: विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधिमंडळात पक्षाची भूमिका मजबूतपणे मांडण्याची जबाबदारी ठाकरेंच्या अवघ्या 20 आमदारांवर असणार आहे.

Roshan More

Shivsena UBT News : विधानसभा विधिमंडळामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांची पक्षाचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर भास्कर जाधव गटनेतेपदी आणि सुनील प्रभु यांची पुन्हा प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळे विधिमंडळात पक्षाची भूमिका मजबूतपणे मांडण्याची जबाबदारी ठाकरेंच्या अवघ्या 20 आमदारांवर असणार आहे.

आदित्य ठाकरे हे वरळीतून विजयी झाले. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवाराचा पराभव केला. ही निवडणूक आदित्य ठाकरे यांना जड जाईल, अशी शक्यता होती. मात्र आदित्य यांनी महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट होत असताना आपली जागा खेचून आणली.

विधानसभेत कोकणातील अवघ्या एका जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विजय मिळवता आला. गुहागरमधून भास्कर जाधव हे विजयी झाले. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

कोकणात युतीचे वर्चस्व

रत्नागिरी- सिंधुदुर्गात शिवसेनेला पाच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक मिळून महायुतीला तब्बल सात जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला गुहागरच्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT