Maharashtra Assembly News : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने राज्यातील वातावरण तापले होते. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्ष एकमेकांशी सुसंवाद साधत आहे. त्यातच आता विधिमंडळाच्या आवारातही सत्ताधारी व विरोधक नेतेमंडळी समोरासमोर आल्यानंतर हास्यविनोद रंगत असतात.
शनिवारी विधिमंडळाच्या आवरात शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे व भाजपचे (Bjp) आमदार प्रसाद लाड समोरासमोर आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात जात असताना कोपरखळी लगावली.
(Aditya Thackeray News)
शनिवारी विधिमंडळाच्या पायऱ्या चढत असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), प्रसाद लाड समोरासमोर आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू त्यांच्यासॊबत होते. यावेळी प्रभू यांनी लाड यांचा हात उंचावून त्यांनी हातात घातलेले रुद्राक्ष आदित्य ठाकरेंना दाखवले.
त्याचवेळी लाड यांनी हे रुद्राक्ष तुमच्यासारखे असल्याचे हाताने इशारा करीत दाखवले. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य यांनी प्रसाद लाड यांना 'आता हिंदुत्व स्वीकारतात वाटतं,' असे म्हणत कोपरखळी लगावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.