Mahayuti Political News : मुख्यमंत्री कोण ? महाविकास आघाडीचाच 'तो' फॉर्म्युला महायुती फॉलो करणार ? अजितदादांचा नेता म्हणाला...

Ncp Politics : आगामी विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असे महायुतीमधील तीन घटक पक्ष सांगत असले तरी याबाबत अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केले आहे.
Mahayuti's Leader
Mahayuti's LeaderSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपला बॅकफूटवर यावे लागले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स थोडा बरा राहिला. अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी करताना महायुतीकडून आतापासूनच दक्षता घेतली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वात लढणार असे महायुतीमधील तीन घटक पक्ष सांगत असले तरी याबाबत अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सस्पेन्स वाढला आहे. (Mahayuti Political News)

आगामी काळात होत असलेली विधानसभा निवडणूक आम्ही महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लढवणार आहोत. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतील. आताच त्याबाबत चर्चा करणे योग्य नाही, असे म्हणत प्रफुल पटेल (prafull Patel) यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप निश्चित नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवल्याची चर्चा रंगली आहे.

राज्यातील महायुती सरकारने शुक्रवारीच बजेट सादर केले आहे. विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत. निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्रि‍पदाबाबत ठरविणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती आणखी मजबूत होईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

Mahayuti's Leader
Video Kundlik Khande News : मोठी बातमी! कुंडलिक खांडेंची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याने कारवाई

भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा, अमित शहा यांची नुकतीच भेट झाली. त्यांना मी सांगितले की, तिघेही आम्ही एकत्र लढणार आहोत. योग्य पद्धतीने जागेचे वाटप होणार आहे. महायुती म्हणून आशिर्वाद मागणार असल्याचे पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्याचे बजेट सर्वांना न्याय देणारे

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेले बजेट सर्वांना न्याय देणारे व सर्वसमावेशक आहे. विरोधकांचे टीका करणं हे काम आहे. त्यामुळे हे निवडणुकीचे बजेट नाही. विरोधकांनी आपल्या काळात कोणाला काय दिले ते पुढे येऊन सांगण्याचा प्रयत्न करावा, अशी टीका पटेल यांनी यावेळी केली.

Mahayuti's Leader
Praful Patel : दिल्ली विमानतळावरील ‘ते’ काम प्रफुल पटेलांच्या काळातील; मोहोळांकडून चौकशीचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com