Sharad Pawar, Narendra Modi, uddhav thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Narendra Modi News : सोलापूरनंतर कऱ्हाडमध्ये मोदींनी टाळला पवार, ठाकरेंचा नामोल्लेख

सरकारनामा ब्युरो

Karhad News : लोकसभा निवडणुकीची राज्यभरात रणधुमाळी सुरू असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदीच्या सोमवारी दोन सभा पार पडल्या. पुण्यातील सभा संध्याकाळी होणार आहे, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे तीन प्रचार सभा होणार आहेत. दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 6 सभा होत आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चढला असतानाच दुसरीकडे पीएम मोदींच्या सभेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नांदेड, परभणी, कोल्हापूर या सहा ठिकाणी आतापर्यंत त्यांच्या सभा पार पडल्या. या सर्व सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना नकली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असली शिवसेना आमच्यासोबत असल्याची टीका केली होती, तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही आक्रमक होत त्यांनी आरोप केले होते. मात्र, शनिवारी कोल्हापुरात झालेल्या सभेनंतर यांनी थोडी मवाळ भूमिका घेतली असल्याचे जाणवत आहे. (Narendra Modi News)

सोमवारी दुपारी सोलापुरात झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस व इंडिया आघाडीवर पंतप्रधान पदाच्या एक वर्षाच्या फ़ॉर्म्युल्यावरून टीका केली. मात्र, बाकी कोणावरही टीका करणे टाळले आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी कऱ्हाड येथील सभेत पीएम मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबद्दल चकार शब्दही काढला नाही. त्यांनी घेतलेल्या या वेगळ्या भूमिकेची चर्चा दोन्ही ठिकाणच्या सभेनंतर श्रोत्यांत रंगली होती.

कऱ्हाड येथील सभेत बोलताना पीएम मोदी म्हणाले की, काँग्रेसने आरोग्य सेवांची वाईट अवस्था केली होती. आजार झाला तर नागरिकांना आपले दागिने विकावे लागत होते. शेती विकावी लगात होती. पण आम्ही आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे चालवून मेडिकल कॉलेज उभारले. ५० हजार एमबीबीएस डॉक्टर निर्माण केले आहेत. हे डॉक्टर ग्रामीण भागात जाऊन सेवा देणार आहेत. गावागावांत आरोग्य सेवांची सुविधा मिळत आहे. साताऱ्यात ४०० आयुष्मान केंद्र बनले आहेत. १५ पेक्षा अधिक मेडिकलमध्ये ८० टक्केपेक्षा कमी किमतीत औषधे मिळत आहेत. कोणत्याही कुटुंबात ७० वर्षांपेक्षा पुढील आजारी व्यक्ती असेल त्यांचा खर्च पीएम मोदी करणार आहेत.

आपली शेती, जमीन, दागिने, मंगळसूत्र हे काँग्रेस एक्सरे करून बघणार आहे. आपल्या घरात काय आहे हे एक्सरे करणार आहे. घराघरात छापा मारणार असून आपली संपत्ती जप्त करणार आहे. काही मर्यादेच्या बाहेर ज्या वस्तू आपल्याकडै आहेत, त्या काढून घेणार आहेत. काय आपण हे होऊन द्याल का, असा सवाल त्यांनी सातरकरांना केला. मोदी प्रयत्न करत आहेत, की प्रत्येक बहिणीच्या नावावर घर असावे. मोदीने कोट्यवधी बहिणींना लखपती बनविण्याची गॅरंटी दिली आहे. मोदीचा संकल्प प्रत्येक बहिणीच्या घरापार्यंत व शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचविणे हे असणार असल्याचे मोदींनी या वेळी स्पष्ट केले.

येणाऱ्या पाच वर्षांत अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असून, एफआरपी मंत्रालय केले आहे. इथेनॉल निर्मितीवर भर देत आहे. पंधराशे कोटी रुपये नागरिकांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कनेक्टिव्हिटीवर काम होत आहे. आपल्याला आग्रह आहे. आपले स्वप्न माझे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

R

SCROLL FOR NEXT