Sharad Koli Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Koli : ''तुम्ही रात्री बॅनर फाडता तर आम्ही तुम्हाला दिवसा फाडू'' ; ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींचा इशारा!

Uddhav Thackerays banner : ठाण्यात उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडल्याने सोलापुरातील ठाकरे गटातील शिवसैनिक संतप्त

Mayur Ratnaparkhe

Solapur News : उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाणे ते मुंब्रा या दरम्यान पोस्टर लावण्यात आले होते. मात्र उद्धव यांचा दौरा होण्याअगोदरच जवळपास 90 टक्के पोस्टर फाडण्यात आले आहेत. या कारणावरून ठाण्यात उद्धव गट आणि शिंदे गटात वातावरण तापलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापुरातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत.उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्र उपनेते शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आणि शिंदे गटातील शिवसैनिकांना इशारा दिला आहे, ''तुम्ही रात्रीचे पोस्टर फाडता, तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला दिवसा फाडू.'' असा इशारा दिला आहे.

याशिवाय ''ज्या मुख्यमंत्र्यांच्या जीवावर हे सर्व काही केले आहे, त्यांची सत्ता आज नाही तर उद्या जाणार आहे.'' अशी टीकाही शरद कोळी यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंचा ताफा ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेची पाहणी करण्यासाठी रवाना झाला आहे. त्यापूर्वीच मुंब्रा पोलिस स्टेशन तसेच शिवसेना शाखा या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याशिवाय मुंब्रा शाळेच्या समोरील रस्त्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त गणेश गावदे यांच्यासह इतर पोलिसदेखील रस्त्याच्या मध्ये उभे आहेत.

मुंब्रा पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड समर्थक कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली असून, घोषणाबाजीलाही सुरुवात झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT