Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा ताफा मुंब्राकडे रवाना; संजय राऊतांसह पदाधिकारीही सोबत!

Thackeray group Vs Shinde group : पोलिसांचा कडक बंदोबस्त; मुंब्रा शाळेच्या परिसरात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमणे सुरू
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena News : उद्धव ठाकरेंचा ताफा ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेची पाहणी करण्यासाठी रवाना झाला आहे. त्यापूर्वीच मुंब्रा पोलिस स्टेशन तसेच शिवसेना शाखा या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Sanjay Raut: ठाकरेंना अडवून दाखवा; राऊतांनी पोलिसांसमोर दंड थोपटले, मुंब्रा येथे तणाव...

याशिवाय मुंब्रा शाळेच्या समोरील रस्त्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त गणेश गावदे यांच्यासह इतर पोलिसदेखील रस्त्याच्या मध्ये उभे आहेत

मुंब्रा पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड समर्थक कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली असून, घोषणाबाजीलाही सुरुवात झाली आहे.

Uddhav Thackeray
Maratha- OBC issue: विखे पाटील यांचा छगन भुजबळांना टोमणा!

शिंदे गट ठाकरेंना विरोध करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलिसांवर आरोप करीत त्यांना आव्हान केलं आहे. "पोलिस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत, तुम्ही आम्हाला अडवून दाखवा," असे सांगत राऊतांनी दंड थोपटले आहेत.

कळवा-मुंब्रा विधानसभाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उद्धव ठाकरेंचे स्वागत करण्यात येणार आहे. कळवा खारेगाव टोल नाक्यावरती जेसीबीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्यावर फुलांची उधळण करून स्वागत करण्यात येणार आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com