Supriya Sule Sarkarnama
महाराष्ट्र

Supriya Sule : सुप्रिया सुळे संतापल्या, 'वाचाळवीरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही'

Sudesh Mitkar

Pune News : मालवणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याचे राजकारण चांगले तापले आहे. या मुद्द्यावरून नारायण राणे यांचे समर्थक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकारावर वाचाळ वीर वक्तव्य करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

बारामती दौऱ्यावरती असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "राज्यातील सरकार विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोश आणि राग आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत असताना हे असंवेदनशील सरकार कोणतेही कारवाई करताना दिसत नाही". तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळल्यानंतर सरकारमधील वाचाळ वीर बोलत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करत आहे. या वाचाळवीरांनी राज्याची माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

बदलापूर घटनेवरून विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "याबाबत आम्ही राजकारण करत नाही. राज्य सरकारने या प्रकारणावर योग्य वेळी ॲक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं असतं, तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती". देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यातील पोलिसावर गुन्हेगार कोयत्याने हल्ला करत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा देणे आवश्यक आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सरकारला जबाबदारीच घ्यायची नाही

मालवणमध्ये राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकांमध्ये प्रचंड राग आणि अस्वस्थता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. पुतळा कोसळतो आणि त्यानंतर सरकारमधील वाचाळवीर काही वक्तव्य करतात आणि याबाबत कोणी जनतेची माफी देखील मागत नाही". पुतळा कोसळला याची जबाबदारी सरकार न घेता ती नौदलावरती ढकलत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारला खुर्ची आणि कॉन्ट्रॅक्टरच लाडके असल्याचं स्पष्ट झाल्या असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

हर्षवर्धन पाटील संपर्कात, पण...

हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 'तुतारी' हातात घेतली, अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळे यावर म्हणाल्या, या सर्व गोष्टींवर मी माध्यमांमधून ऐकत आहे. अजून महाविकास आघाडीमध्ये सीट वाटप झालेले नाही, ते सीट वाटप होईल आणि त्यानंतर उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाईल".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT